राज्यसभेत आंबेडकरी चळवळीचा आवाज घुमणार… शिवसेनेकडून आक्रमक चेहरा, कोण आहे उमेदवार?

राज्यसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा ज्योती वाघमारे यांना संधी दिलीयं.

Untitle (13)

Rajyasabha Candiate Jyoti Waghmare : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेमका कोण उमेदवार असणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी दिग्गजांना डावलून आंबेडकरी चळवळीतील एका महिला उमेदवाराला उमेदवारी दिलीय. अखेरच्या क्षणी रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) या दोघांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. ज्योती वाघमारे बराच काळापासून शिंदेंच्या शिवसेनेची आक्रमकपणे बाजू मांडत खिंड लढवताना दिसून आलेल्या आहेत. त्यामुळेच शिंदेंनी वाघमारेंना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे.

ज्योती वाघमारे यांची सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख. त्यांची कौंटुबिक पार्श्वभूमी गरीब कुटुंबातील असून एक स्पष्ट वक्ता, निवेदिका म्हणून त्या सोलापुरात परिचित आहेत. यासोबतच त्यांना मातृभाषा तेलगू, इंग्रजी भाषेत पीचडी, मराठीवर प्रभुत्व असल्याने त्या राजकारणात एक प्रभावी वक्ता ठरलेल्या आहेत.

निलेश घायवाळ कनेक्शननंतर आता कौटुंबिक वाद…, सागर मोहोळकर गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट?

2014 साली त्यांनी सोलापुरात महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेतून राजकारणात रिएन्ट्री केली. अनेकदा त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीकेची तोफ डागत प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात महिला नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. त्याचवेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला साथ देत ही पोकळी भरुन काढली म्हणूनच शिंदे गटाकडून त्यांची थेट प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नुकत्याच नगरसेविका झालेल्या आदिवासी महिलेला भाजपकडून राज्यसभेवर संधी; कोण आहेत मायाताई इवनाते?

ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली असून दहावीच्या परिक्षेत 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आहेत. बारावीमध्ये त्या पुणे विभागातून मागासवर्गीयांमध्ये प्रथम आल्या होत्या. तसेच अनेकदा त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर सडेतोडपणे बाजू मांडणाऱ्या संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत.

वडील नागनाथ वाघमारे सोलापुरात नगरसेवक होते…
डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटरचे तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले. चळवळीतील कामाचा पोचपावती म्हणून सोलापूरमधील नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत नागनाथ वाघमारे यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.

follow us