वाजपेयींचा हवाला देत संजय शिरसाटांचे अनिल बोंडेंना प्रत्युत्तर
Sanjay Shirsat On Anil Bonde : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे. आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर तोडंसुख घेण्यात येत आहे. काही वेळापूर्वी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. त्याला आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अनिल बोंडे हे माझे मित्र आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री हे फक्त ठाण्याचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आपल्या नेत्यासाठी बोलताय पण युतीसाठी हे बरोबर नाही. वरती शिंदे साहेब, फडणवीस साहेब आहेत. सगळे निर्णय घेण्याचे अधिकार आपल्याला नाहीत. आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत. वाद सगळीकडेच असतात. पण याचा फायदा विरोधक घ्यायला लागलेत, असे शिरसाट म्हणाले.
‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण
यावर शिंदे आणि फडणवीस साहेबांनी देखील सामंजस्याची भूमिका घेतली असे ते म्हणाले. तसेच आम्ही सर्वस्व पणाला लावून जर बाहेर पडलो नसतो तर आज हे सरकार आलं नसतं. हे कोणीही नाकारु शकत नाही. नाही तर सगळे हातावर हात धरुन बसले असते. परंतु हिम्मत आम्ही केली आणि सराकार आणलं. जर कुणाला वाटत असेल हे आम्हाला वरचढ होत आहेत. वाजपेयींच सरकार एक मताने पडलं होतं, असे म्हणत त्यांनी बोंडेंना सुनावले. त्यामुळे नाराज कुणाला करु नये. सगळ्यांना सामावून घ्या आणि हातात हात धरुन काम करा, असेही ते म्हणाले.
‘नुसत्या नकला काढून मुख्यमंत्री होता येणार नाही’; आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं!
अनिल बोंडे काय म्हणाले होते
बेडूक कितीही हवा भरली तरी तो हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे हे उत्तम मुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांच्या आजूबाजुचे लोक त्यांना चुकीचे सल्ले देत असल्याचे बोंडे म्हणाले. शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी केला आहे.