शिरसाटांनी सांगितला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त; ‘या’ तारखेच्या आत होणार मंत्री

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (3)

Sanjay Shirsat On Cabinet Expansion :  शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोपांवर स्पष्ट करतो की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

अजित डोवाल यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र  मोदींकडे बोलनीचा निरोप पाठवला होता,मात्र मोदी यांना बोलायला नाही म्हणाले. राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले हे कोणत्या तत्वात बसते, तुम्हाला न बोलवता तुम्ही गेले त्यामुळे तुम्ही मातोश्रीची किंमत घालवली, असा टोला शिरसाटांनी लगावला. राऊतांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून फाटाफूट केली आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने नव्या नेत्याची गरज आहे, असे शिरसाट म्हणाले.

Video : गुजरात दंगल : मोदी टार्गेटवर कसे आले?

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील भाष्य केले. नेत्यांनी तुम्हाला दाखवून दिले की आपण एका लायनीत बसायला हवे,उद्धव ठाकरे यांच्या साठी असलेली विशेष खुर्ची काढायला लावली. सिल्व्हर ओक वर जाऊन कॉम्प्रेमाईज करावं लागतं. अजित पवार यांनी खुट्टा ठोकला त्यामुळे तुमच्यात बदल झाला, आता तुमची जळलेली आहे, असे म्हणत शिरसाटांनी ठाकरेंना डिवचले. तसेच  सामना पेपरमध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटो न दिसता राहुल गांधी दिसतात, असेही ते म्हणाले.

राऊतांचा वेडसरपणा नीट करायचा उपाय आमच्याकडं; नारायण राणेंचा थेट इशारा

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर देखील भाष्य केले. 20 तारखेच्या आधी विस्तार होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीवरून आल्यावर याचे उत्तर मिळेल.  मंत्री मंडळाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी मोठ्या नेत्यांकडून अप्रुवल घेतले असून देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब घोषणा करतील. अद्याप कोणताही फॉम्युला ठरलेला नाही, प्रत्येकाला संधी दिली जाणार असून छोट्या गोष्टी साठी भांडण होणार नाहीत, असे शिरसाटांनी सांगितले.

Tags

follow us