सत्ता गेल्याने विरोधकांचा थयथयाट होतोय; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

सत्ता गेल्याने विरोधकांचा थयथयाट होतोय; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Shrikant Shinde On Uddhav Thackeray :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावेळी ते डोंबिवली येथे सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याने हा थयथयाट सुरु असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसत्या शिव्या श्राप देण्याचे काम केलं जात. अशी परिस्थिती महाराष्ट्राने कधी पाहिल् पाहिली नव्हती. जो कधी विचार केला नव्हता ते झाल , राज्यात सत्ताबदल झाला , त्यामुळे हा थयथयाट सुरू आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

मोठी बातमी ! पुण्यात नऊ ठिकाणी ईडीची छापेमारी.. मुश्रीफांच्या अडचणी वाढणार

तसेच  विकासाचा एकही शब्द काढायचा नाही , जे आज मोठ्या मोठ्या सभा करतायत त्यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे सभेतून सांगितले पाहिजे असं आव्हान करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदे हे काल डोंबिवली येथे सावरकर गौरव यात्रेतून बोलत होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याने राज्यामध्ये सावरकर गौरव यात्रा काढली आहे. यावेळी भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण  हे देखील या यात्रेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांवर टीका केली आहे.

औकात काढणाऱ्या मंत्र्याला रोहित पवारांनी सुनावले, फक्त ‘वाट’ लावू नका!

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार? काय त्याची औकात आहे? त्याच्याबद्दल काय बोलायला पाहिजे? बोलण्याच्या औकातिचा तो माणूस नाही. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका रोहित पवार यांच्यावर केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube