…म्हणून सोशल मीडियात ‘सर्जेराव’ म्हणत ट्रोल केलं जातंय

…म्हणून सोशल मीडियात ‘सर्जेराव’ म्हणत ट्रोल केलं जातंय

अहमदनगर : महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे जेव्हा संगमनेरला आले तेव्हा त्यांनीच सत्यजीत तांबे यांचं नाव सर्जेराव ठेवल्यासंदर्भातलं एक पत्र सत्यजीत तांबे यांनी ट्विट केलंय. ‘सर्जेराव’ नावाने ट्रोल करण्यावरुन तांबे यांनी एक ट्विट करत या नावामागचा खुलासा केला आहे.

”लहानपणी मला थोर माणसांच्या सह्या गोळा करण्याची फार आवड होती. संगमनेरला ज्या अकोलकर वाड्यात माझा जन्म झाला तेथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम येत असत. तेव्हाच ही सही घेतलेली. बाबासाहेबांनी आवडीने माझे नाव ‘सर्जेराव’ असे ठेवले होते. बाबासाहेबांना जन्मशताब्दीदिनी अनंत शुभेच्छा!, असे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं होत. तसेच, बाबासाहेब पुरंदरेंनी केलेल्या सहीचा फोटोही त्यांनी शेअर केला होता.

WhatsApp Image 2023 01 13 At 3.54.11 PM

WhatsApp Image 2023 01 13 At 3.54.11 PM

या ट्विटनंतर सोशल मीडियातून त्यांना ट्रोलही करण्यात आले. सर्जेराव या नावाने त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. या घटनेसंदर्भात भलंमोठं पत्र लिहून सत्यजीत तांबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या लिखानाचे कधीही समर्थन केले नाही, असेही त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, ट्विटरवरील 280 शब्दांच्या मर्यादेत सर्वच भावना व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे हे पत्र लिहित असल्याचंही तांबे यांनी सांगितलं.

दरम्यान, आपल्या विचारधारेच्या लोकांकडून यंदा मी ट्रोल झालो आहे, त्यांचा मी आदर करतो. पण, विचार समजून न घेता केलेला विरोध केव्हाही वायाच जात असतो, असं मला वाटतं, असे म्हणत मी हे पत्र लिहित असल्याचे सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारत आपल्या मुलाचा सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे सत्यजीत तांबे चर्चेत आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube