Vidhan Parishad Election Satyajeet Tambe : …तर भाजपला देखील पाठिंब्या बद्दल बोलेल

  • Written By: Published:
Vidhan Parishad Election Satyajeet Tambe : …तर भाजपला देखील पाठिंब्या बद्दल बोलेल

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे प्रचार दरम्यान नाशिकमध्ये आज पत्रकारांशी बोलताना म्हणालेकी वेळ आल्यावर भाजपला देखीलपाठिंब्या बद्दल बोलेल. मी जरी ही निवडणूक अपक्ष लढत असलो तरी मला रोज अनेक संघटना पाठिंबा देत आहेत.

पुढे सत्यजित तांबे म्हणाले, मला आता पर्यंत TDF ने, NDST संघटनेनं, महाराष्ट्र ज्युनिर कॉलेज संघटनेन पाठींबा दिला आहे. गेली पंधरा वर्ष इथले सीटिंग आमदार माझे वडील डॉ सुधीर तांबे यांनी या मतदारसंघाचा जे काम केली आहेत त्या कामाचा मला नक्कीच फायदा होईल तसेच त्यांनी काम करून जे मन जिंकायचं काम केलं तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

गेल्या सात-आठ दिवसात आमच्याबाबत खूप राजकरण झालं पण त्याचा आम्हांला काही फरक पडत नाही. जे काही राजकीय प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तर पणे एका वेगळ्या व्यासपीठावर देणार आहे. मला भुजबळ साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांना पूर्ण पार्श्ववभूमी मी निश्चित सांगेल असे देखील तांबे यावेळी म्हणाले.

तसेच जा संघटनांनी पाठिबा दिला सर्वांचे तांबेनी आभार मानले. आता येत्या काळात तांबे नक्की कोणाबद्दल आणि काय-काय खुलासे करतात हे पाहणं देखील तेवढंच उत्सुकतेचं असेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube