मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत; दिलीप घुले म्हणाले, गुलाल घेऊनच आलोय

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असताना दिलीप घुले यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 27T135845.494

Marathwada Graduate Constituency Election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत महायुतीचे सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुले यांच्यात तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या दिवशी तिन्ही उमेदवार प्रत्यक्ष केंद्रावर दाखल झाले. यावेळी दिलीप घुले यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत, आपण गुलाल घेऊनच आलो असल्याचं सांगितलं.

ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य माणसाने दिलेली लढाई असल्याचं घुले यांनी म्हटलं. निवडणुकीसाठी परीक्षा दिली असून, आज निकालाचा दिवस आहे आणि गुणवत्ता यादीत आपला निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लढाईत सामान्य लोकांनी केलेलं सहकार्य अनमोल असल्याचं सांगतानाच, निकालानंतर त्याची प्रचिती येईल, असंही ते म्हणाले. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी किती तयारी केली, याची आपल्याला कल्पना नसली तरी आपण मात्र जोरदार मेहनत आणि परिश्रम घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या सर्व्हेत कराळे मास्तरांना 15 हजार मतांचा अंदाज? मतदानाआधी ढसाढसा रडले अन्

उद्धव ठाकरे यांचा आदेश मिळाल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते, असं घुले यांनी सांगितलं. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख, समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात काम केलं. आपल्याकडे मेहनत आणि परिश्रम याशिवाय दुसरं काहीच नव्हतं, असंही त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडीतील दुसऱ्या उमेदवाराच्या रिंगणातील उपस्थितीचा काही ठिकाणी परिणाम झाला असला, तरी त्याचा फायदाही होऊ शकतो. नेमका परिणाम काय झाला, हे निकालानंतरच स्पष्ट होईल, असं घुले यांनी म्हटलं.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील मतभेदांचं चित्र दिसून आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलीप घुले यांची उमेदवारी आधीच जाहीर केली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह पाटील निवडणूक रिंगणात उतरले. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती. घुले यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या रणनीतीचा भाग असल्याचीही चर्चा होती. आता मतमोजणी सुरू झाल्यानंतर या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us