राणे-वडेट्टीवार वादात मुनगंटीवारांची उडी; म्हणाले, वक्तव्य करताना नेहमी..

vijay wadettiwar, nitesh rane and sudhir mungantiwar

Sudhir Mungantiwar : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक टीका करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर लक्ष ठेवा हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित ते मंत्री होतील असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर (Maharashtra Politics) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला होता. या दोन्ही नेत्यांतील वादात आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उडी घेतली आहे.

ते म्हणाले, की त्यांच्यातील टीकेचा अर्थ नितेश राणे आणि वडेट्टीवार यांनाच विचारला पाहिजे. राजकीय क्षेत्रात वक्तव्य करताना गंभीरतेने करावे. सध्याच्या काळात वक्तव्य गंभीरपणे केलं जात नाही. वडेट्टीवार कधी कधी म्हणतात सरकार जाणार, त्यांच्या या वक्तव्यावर नितेश राणे यांचं उत्तर असू शकतं.

Uddhav Thackeray : मोदी सरकारच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या फुग्याला टाचणी; ठाकरे गटाचा हल्लाबोल

नितेश राणे काय म्हणाले होते ?

राणे यांनी काल सकाळी पत्रकार परिषदेत ठाकरे गटासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली. राणे म्हणाले, भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे असा खोचक टोला त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला होता.

follow us