कचनेर येथील जैन मंदिरातून चोरीच्या सोन्याच्या मूर्तीचा 24 तासात छडा

कचनेर येथील जैन मंदिरातून चोरीच्या सोन्याच्या मूर्तीचा 24 तासात छडा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कचनेर येथील प्रसिद्ध असलेल्या जैन मंदिरातून दोन किलो वजनाची एक सोन्याची मूर्ती चोरी झाली होती. या प्रकरणी मध्यप्रदेशातील या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 94 लाख 87 हजार 797 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनीष केलवानिया यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

यासंदर्भात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी जलद गतीने तपास करून या प्रकरणात पोलिस अधीक्षक मनीष कलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिसाची पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी 1) अर्पित नरेंद्र जैन वय 32 वर्ष राहणार शिवपुरी तहसील शिवपुरी जिल्हा गुना मध्य प्रदेश राज्य, 2) अनिल भवानी दिन विश्वकर्मा वय 27 वर्षे राहणार शहागड तालुका शहागड जिल्हा सागर मध्यप्रदेश या दोन आरोपींना अटक केली.

दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक देविदास गात, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत भालेराव, नदीम शेख, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनीही कामगिरी केली आहे अशी माहिती आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सदरील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube