सामना हे वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचं पॅम्प्लेट…मुनगंटीवारांचा खोचक टोला

Untitled Design   2023 05 08T170555.665

Sudhir Mungantiwar on Saamana Editorial : शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत मजकूर छापण्यात आला होता. यावर आता भाजपचे आमदार तसेच मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामना हे काही वर्तमानपत्र नसून ते तर शिवसेनेचे पॅम्प्लेट आहे. ते जर वर्तमानपत्र असतं तर त्याच्यावर बोलायचं पण ते वर्तमानपत्र नाही असा खोचक टोला मुनगुंटीवार यांनी लगावला आहे.

2019 च्या निवडणूक पार पडल्यानंतर व सत्तेची गणित विस्कटल्यांनंतर भाजप व ठाकरे गट यांच्यातही दुरावा वाढला आहे. यातच दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे करत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. व त्यांनतर काही काळाने तो मागे देखील घेतला. यावर सामनामध्ये अग्रलेखात छापण्यात आले.

याच घडामोडीवर आता पत्रकारांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ते म्हणाले, सामना हे वृत्तपत्र नसून पॅम्प्लेट आहेत त्यात ते काय लिहतात त्याच उत्तर आम्ही कशाला द्यायचे. मुळातच ते कोठे वर्तमानपत्र आहे. सामानाच्या माध्यमातून शिवसेना आपल्या पक्षाचे विचार ते ठेवत असतात त्यात जनतेचा विचार कुठे केला जातो असा घणाघात त्यांनी गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

नितीश कुमारांना त्यांचं राज्य सांभाळता येईना…
नितीश कुमार यांनी मुंबईत येत उद्धव ठाकरेंना भेटावं तसेच त्यांनी इतर राज्यात जाऊन सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करावे. यांचा देशाच्या विकासाचा, देशाच्या उन्नतीचा, आत्मनिर्भरतेचा मुद्दा सोडून यांना केवळ खुर्ची पाहिजे आहे. नितीश कुमार महाराष्ट्रात कशाला येत आहे? त्यांना त्यांचं राज्य सांभाळता येत नाही. त्यांना त्यांचे राज्य पुढे घेऊन जाता येत नाही. या सर्वांना मोदी नको आहे.

यांना विकासात्मक स्वातंत्र्य नको आहे, यांना केवळ सत्ता हवी आहे. मात्र ये जो पब्लिक है ये सब जानती है… ते आगामी निवडणुकीत यांना योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Tags

follow us