Supriya Sule : यांना फसवणारा ‘ताे’ नेता काेण ?

Supriya Sule : यांना फसवणारा ‘ताे’ नेता काेण ?

नवी दिल्ली : मी आणि माझ्या वडिलांच्या विराेधातील जुन्या केसेस भाजप (BJP) पुन्हा सक्रिय करुन आम्हाला जेलमध्ये टाकतील. त्यामुळे आम्ही भाजप जाॅईन करताे, असे एकदा एका नेत्याने मला फाेन करुन सांगितले. तेव्हा त्यांना बाेलावले आणि चर्चा केली. मी त्यांना म्हटले की घाबरण्याचे काही कारण नाही, काहीही हाेणार नाही. मात्र, माझ्या भोळेपणाचा त्या नेत्याने फायदा घेतला. तसेच खोटे सांगून पक्ष सोडला. नंतर मी माहिती घेतली असता, त्याने मला खाेट्या केसचं कारण देत फसवल्याचे लक्षात आले, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले. मात्र, राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने खोटे कारण देत भाजपमध्ये प्रवेश केला? सुळे यांना फसविणारा तो नेता कोण? याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

एका खासगी यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आराेप केला आहे. त्यांना, तुम्हाला आयुष्यात कोणी धोका दिल्याची भावना कधी झाली का? या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी त्या नेत्याचे नाव आता सांघणार नाही. परंतु, महाविकास आघाडी स्थापन झाली म्हणजे २०१९ च्या आधीची ही गाेष्ट आहे. त्या नेत्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याने मला त्यावेळी खूप त्रास झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता, आपल्या वडिलांप्रमाणे अनेक वर्षे राजकारणात आहे. तो मला माझ्या कुटुंबातील सदस्यासारखाच होता. तो पक्ष साेडण्याबाबत मला बाेलला. त्याला फोन केला तेव्हा जुन्या केसेसच्या अडचणी सांगू लागला. घरी या. तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्यावर आपण बाेलू. त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता, असे सांगितले. घरी आल्यानंतर त्याच्यासोबत तब्बल तीन तास चर्चा झाली. ताे नेता म्हणाला की, मी भाजपमध्ये गेलो नाही तर माझ्या वडिलांना जेलमध्ये जावे लागेल. आमच्याविरोधात केस उभी पुन्हा सक्रिय केल्या जातील. याबाबत चर्चा झाल्यानंतर विचार करून सांगताे, असे तो नेता म्हणाला, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर संबंधित खात्यातील मंत्र्याला फोन करून मी त्या केसबाबत माहिती मागविली, असता त्या मंत्र्याने सांगितले की, या केसची डिटेल्स बाहेर काेणालाही देता येत नाही. मात्र, या केसमध्ये काहीही दम नाही. या घटनेनंतर त्या नेत्याने फसविल्याचे मला समजले, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube