बाळासाहेबांचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला

बाळासाहेबांचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला

Susham Andhare Speak On Raj Thackeray : रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. यावेळी त्यांनी सभेतून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केलं होत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीने घेतलेली भूमिका आणि या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार यांच्या पाठिशी शिवसेना उद्धव ठाकरे गट ठामपणे उभी आहे. मात्र बाळासाहेबांचे वारसदार असल्याची बनावटगिरी करणाऱ्यांचा मुखवटा निश्चितपणे गळून पडला अशा शब्दात अंधारे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी जनतेला जाहीर सभेतूनच एक महत्त्वाचं आवाहन केलं होत. मतदारांनो महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज यांनी केलं होत.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी सकाळी केलेलं ट्विट हे आपल्या ट्विटर अकाउंटवरून डिलीट करून टाकलं होत. सीमा भागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. पण अवघ्या काही तासातच राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवरून यु टर्न घेतल्याचे याद्वारे स्पष्ट झाले. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चां रंगू लागल्या होत्या. दरम्यान हे सगळं सुरु असताना राज यांच्या या भूमिकेवर सुषमा अंधारे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकिकरण समितीने घेतलेली भूमिका आणि या निवडणुकीत त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांच्या पाठिशी ठाकरे गट उभा आहे. मात्र यातून एक गोष्ट पुढे आली, महाराष्ट्रात आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे वारसदार आहोत, आम्ही मराठी अस्मिता आणि बाणा जपणारे आहोत, असं काही माणसं सांगत होती.

आम्ही पक्षात काय करतो राऊतांना माहिती नाही…पवारांचे राऊतांना प्रत्युत्तर

मात्र हीच माणसं महाराष्ट्रात भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन त्यांची तोतयागिरी करत असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, बाळासाहेबांचे वारसदार असल्याची बनावटगिरीचा त्यांचा मुखवटा निश्चितपणे गळून पडला आहे. परंतू काही नेत्यांनी महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पाठिशी उभं राहण्याची भूमिका घेतली असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube