अंधारे म्हणाल्या… आम्ही गुलाबरावांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी देतोय

Untitled Design   2023 04 23T145003.399

Sushma Andhare Speech : जळगावात उद्धव ठाकरे याची सभा पार पडणार आहे. यातच सभा उधळून लावू असा इशारा शिंदे गटातील मंत्री गुलाबरा पाटील यांनी दिला होता. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील यांनी खरंच प्रयत्न करावा, आम्ही त्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी देतोय अशा शब्दात अंधारे यांनी गुलाबरावांना शब्दिका टोला लागवला आहे.

नवी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या. यावेळी जळगावात उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे. या सभेला उधळून लावू असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी देखील गुलाबराव पाटील यांना टोला लगावला होता.

आता त्यापाठोपाठ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना याबाबत विचारण्यात आले असता. अंधारे म्हणाला, गुलाबराव पाटील यांनी खरंच प्रयत्न करावे, आम्ही त्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी देतोय. इन्सिक्युरिटी वाढली की माणसं हिंसक होऊन अधिक हिंसकतेने बोलतात. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

यावेळी बोलताना त्यांनी मनसेवर देखील निशाणा साधला. मनसे प्रवक्त्यांनी केलेल्या टीकेवर अंधारे यांनी एका वाक्यात उत्तर दिले. त्या म्हणाल्या मी प्याद्यांवर बोलत नाही. प्याद्यांची पत्रावर उत्तर देताना झालेली तारांबळ पाहून मजा येते. तसेच मी पत्र राज ठाकरेंना लिहिले आहे. ते यावर काही बोलतील त्यावर मी उत्तर देईल असे अंधारे म्हणाल्या आहेत.

साडी असो वा स्कर्ट ही अभिनेत्री दिसतेच बोल्ड

अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देत आहेत, म्हणजे त्यांनी हार मान्य केली आहे. एकनाथ शिंदे जाणार ही गुजरातच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी खरी आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे महविकास आघाडीचाच माणूस मुख्यमंत्री होईल आणि शिंदे गट विरोधीबाकावर काय कुठेच असणार नाही. हे फडणवीसांनी मनोमन मान्य केले आहे. असाच याचा अर्थ होतो. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Tags

follow us