उद्धव ठाकरेंनी गडाखांकडून घेतलेल्या खोक्यांवर बोलावं; शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांचं आव्हान

Untitled Design   2023 04 02T151919.210

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन प्रमुख पक्षांची आज सभा होत आहे. या वज्रमुठ सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नेते हजर राहणार आहेत. या सभेत मविआतील नेते कोणती भूमिका मांडणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, अशी टीका त्यांनी केली.

शिरसाट यांनी बोलतांना सांगिलतं की, गर्दी झाली तरी हरकत नाही. मात्र, शहरातील गेल्या 2-4 दिवसातील वातावरण पाहता, सभा शांततेत झाली पाहीजे. या सभेमुळं शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना स्टेट लेव्हलचा नेता केलं आहे. हे दुर्दैव आहे. पूर्वी उद्धव ठाकरे ज्या अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. ते एक राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र, शरद पवारांनी ठाकरेंना त्यांची जागा दाखवली की, तुम्ही राष्ट्रीय स्तरावरील नेते नाही आहात. आणि आता आपण पाहतोय की, ठाकरेंना कोणत्या स्तरावर आणून बसवलंय? अजित पवार, नाना पटोले यांच्याबरोबर सभा घेण्याची वेळ ठाकरेंवर आली आहे, असं शिरसाट म्हणाले.

बेरोजगारांना काम देण्यासाठी पुणे झेडपीचा अनोखा प्रयोग, काढणार डिजिटल लॉटरी

दरम्यान, यावेळी बोलतांना शिरसाट यांनी ठाकरेंना आव्हान केलं. ते म्हणाले, की, या सभेमध्ये गद्दार, खोके-बिके, असंच काहीतरी ते लोक बोलणार. पण माझाही प्रश्न असा आहे की, 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. त्यावेळी शंकरराव गडाख हे अपक्ष उमेदवार होते. तेव्हा त्यांना मिलिंद नार्वेकर हे स्वत: चार्टर विमान घेऊन गेले आणि गडाखांना घेऊन आले. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. या सभेत ठाकरेंनी स्पष्ट करावं की, गडाखांना कॅबिनेट मंत्री का केलं? त्याचं नेमकं कारण तरी काय? आणखी दोन अपक्ष आमदारांना मंत्री का केलं? शिवसेनेचे 56 आमदार होते, त्यांच्यातल्या कुणाला मंत्री केलं असतं तर काय वाईट झालं असतं का? गडाख का? तुमचं गडाखांवाचून काय अडत होतं?

तुमच्या कोणत्या पक्षाच्या बैठकती तो माणूस कधी बसलाय का? त्यांनी काही शिवसेना वाढवली नाही. मग गडाखांना मंत्रीपद दिलं तरी का? बहुमताला आकडाही काही कमी पडत नव्हता. मग किती खोके घेऊन यांना मंत्रीपद दिलं तुम्ही? असचं तर नाही देत ना कुणाला मंत्रीपद? खोक्यांशिवाय तर काम झालं नसेल. गडाखांकडून खोके घेतले असतील, त्यामुळंत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं असेल. आता फक्त किती खोके घेतले होते, याची कबुली त्यांनी आज सभेत द्यावी, अशा शब्दात शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube