‘गल्लीबोळातल्या नेत्या’म्हणणाऱ्या फरांदेंवर अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या..,
Sushma Andhare Vs Devyani Farande : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि भाजपच्या आमदार देवयांनी फरांदे (Devyani Farande) यांच्यात चांगली रणधुमाळी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी नाव न घेता आरोप केल्यानंतर देवयानी अंधारे यांनी अंधारेंविरोधात थेट अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपत आहे. अशातच आता सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत देवयांनी फरांदेंवर पलटवार केला आहे.
मला गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या म्हणत असतील तर याचं गल्लीबोळातल्या लोकांच्या मतांवर माणसं आमदार केली जातात, हे गल्लीबोळातल्या लोकांचं चुकतं का? असा उपरोधिक सवाल करीत सुषमा अंधारे यांनी देवयांनी फरादेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अनेकदा पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारे यांचा आधी उबाठा नेत्या, आदरणीय नेत्या, गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या, असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं आहे.
सुषमा अंधारे पोस्टमध्ये म्हणाल्या, “आमदार देवयानी फरांदे यांची स्क्रिप्ट नक्की कोण लिहून देतो कळत नाही. ज्यांना माझ्याशी थेट भिडता येत नाही ते असे एकेकाला manipulate करून पुढे पाठवतात. फरांदेची दर दिवसाला त्यांची भाषा बदलते. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी माझ्या संबंधाने सभागृहाच्या पटलावर बोलताना त्या “शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे_ असा उल्लेख करतात.
Nana Patekar: तुमच्याही घरी येणार नानांनी लिहिलेलं पत्र! वाचा काय असणार मजकूर
दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्या “शिवसेनेच्या नेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे” असा उल्लेख करतात. तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या पटलावर पुन्हा बोलताना त्या “गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे” असा उल्लेख करतात. मला घोळ कळत नाही की यातलं नेमकं काय खरं ? याचा अर्थ देवयानी फरांदेना आधी आपण विरोधकाला नेता म्हणून चूक केली आता ती सावरण्यासाठी त्यांना गल्लीबोळातला ठरवावं असं वाटत आहे का? पण जर मग मी गल्लीबोळातला माणूस असेल तर पुन्हा दोन प्रश्न निर्माण होतात.
मी गल्ली बोळात काम करते आणि माझं प्रभावक्षेत्र फार वाढलेलं नसेल तर मग सभागृहाच्या पटलावर सलग तीन दिवस तुम्हाला माझ्या नावावर चर्चा का करावीशी वाटते ? तुमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागच्या वर्षीच्या त्याच हिवाळी अधिवेशनामध्ये माझा राजीनामा का मागावासा वाटतो? अन माझा उल्लेख गल्लीबोळातल्या लढणाऱ्या असा करणार असाल तर तुम्हाला गल्लीबोळातली माणसं कमी प्रतीची वाटतात का? पण याच गल्लीबोळातल्या लोकांच्या मतांवर तुमच्यासारखी माणसं आमदार केली जातात. हे गल्लीबोळातल्या लोकांचे चुकते का? असा सवाल उपस्थित करीत जर चुकत असेल तर मग पुढच्या वेळेला चूक दुरुस्त करावी लागेल” असा इशाराही सुषमा अंधारे यांनी देवयानी फरांदे यांना दिला आहे.