आदित्य ठाकरेंच्या रक्षणार्थ, उद्धव ठाकरेंसह ठाकरे गट नागपूरात

आदित्य ठाकरेंच्या रक्षणार्थ, उद्धव ठाकरेंसह ठाकरे गट नागपूरात

नागपूर : आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरुन झालेल्या आरोपांनंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळं ठाकरे गटाची फौज आज नागपुरात दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवन परिसरातल्या पक्ष कार्यालयात आदित्य ठाकरेंच्या रक्षणार्थ बैठक घेणार आहेत.

या बैठकीबरोबरच सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरल्यास त्यांच्या रक्षणार्थ सत्ताधाऱ्यांचे आक्रमण कसे परतावून लावायचे यासाठी रणनिती आखण्यात येणार आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन प्रकरणावर दुपारनंतर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडे आदित्य ठाकरेंच्या रक्षणार्थ रणनिती आखण्यासाठी दुपारपर्यंतचा वेळ आहे.

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतो आहे. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे दिग्गज नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर नागपूरमध्ये आले आहेत. त्यामुळं अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार असल्याचं दिसून येत आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारकडून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आता

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी नवी मुंबईमधील सभेतून शिंदे-फडणवीस सरकारला तसा इशारा देखील दिला होता. ‘एयु’ प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना घेरल्यानंतर आता ठाकरे गटानेही शिंदे फडणवीस सरकारला जोरदार उत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे. संजय राऊत यांनी रविवारी बोलताना नागपुरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिल्यामुळं आज नागपुरात नक्की काय घडणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube