‘आप’चा दिल्लीकरांना शॉक; ‘आजपासून वीजेवरची सब्सिडी बंद’

  • Written By: Published:
Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (4)

APP Government Stop Subsidies Electricity In Delhi : दिल्लीच्या केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारने जनतेला दिली जाणारी मोफत वीज सब्सिडी (Electricity subsidy) बंद करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती देताना ऊर्जा मंत्री आतिशी (Energy Minister Atishi) म्हणाल्या की, ‘आजपासून दिल्लीतील लोकांना दिली जाणारी सब्सिडी वीज बंद केली जाईल. म्हणजेच उद्यापासून सब्सिडीची बिले दिली जाणार नाहीत.

सब्सिडी बंद करण्याचे कारण देताना आतिशी म्हणाल्या की, ‘आप सरकारने येत्या वर्षभरासाठी सब्सिडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण ती फाईल दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे आहे आणि जोपर्यंत ती फाइल परत केली जात नाही तोपर्यंत मोफत वीज सब्सिडी बंद करण्यात आली आहे. आप सरकार सब्सिडी देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले, आप सरकारचा हा निर्णय दिल्लीच्या जनतेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात वीज अनुदानाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. सीएम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला मोफत वीज आणि पाण्यावरील सब्सिडी पूर्वीप्रमाणे सुरू ठेवायची आहे, तर एलजीने एका पत्राद्वारे सब्सिडी थेट ग्राहकांच्या खात्यावर पाठवण्याची सूचना केली आहे.

दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आल्यापासून वीज आणि पाणी बिलांवर सब्सिडीचा फायदा ग्राहकांना मिळत आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये अरविंद केजरीवाल सरकारने मोफत वीज योजनेत बदल करताना मागणीनुसार सब्सिडी देण्याबाबत बोलले होते. त्यामुळे सुमारे 25 टक्के लोक सरकारच्या वीज अनुदानाच्या कक्षेबाहेर होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube