महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार

महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार

नागपूर : महापुरूषांचा अपमान करतात म्हणून भाजप आणि शिंदे गटावर गेल्या काही दिवसांत अनेकदा आरोप करण्यात आले मात्र आज विधिमंडळाच्या नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार घेतला.

गेल्या काही दिवसांपासून पाहतोय रोज हातात फलकं, बॅनर घेऊन पायऱ्यांवर आंदोलनं, आम्हाला बदनाम करतात. राजीनामे मागतात. महापुरूषांचा अपमान करतात म्हणून आम्हाला बदनाम करतात. पण छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला कालही वंदनीय होते, आजही वंदनीय आहेत आणि उद्याही वंदनीय राहतील. पण विरोधक ध चा मा करतात. पण जी बदनामी तुम्ही करताय त्यावर मला विचारायचे आहे की, छत्रपतींच्या वारसदारांना पुरावे कोणी मागितले ? राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छत्रपती संभाजी राजेंकडे प्रतिज्ञापत्र कोणी मागितले ? छत्रपती शिवाजी महाराजांना जानता राजा म्हणू नका म्हणून कोणी सांगितले ?

अजित पवार आमच्याबद्दल बोलतात पण या टोमने सेनेच्या नवशिखे कार्यकर्त्यांनी कोणालाही जिजामातांच्या उपमा दिल्या त्याबद्दल अजित पवार बोलत
नाही. तर संतांचा अपमान केल्याने वारकरी नाराज झाले. त्यांनी संतांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर भारत जोडोच्या नावाखाली सांवरकरांचा जाणीवपूर्वक अपमान केला गेला. पण आम्ही महापुरूषांचा नेहमी सन्मानच केला आहे. मंत्रालयात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले आणि ज्यातिबा फुलेंचे तैलचित्र इतके वर्ष तुम्ही लावू शकलेले नाही. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आम्हीच लावला. फक्त त्यांच्या नावाने मत मागायतचे आणि करायची वेळा आली की, हात वर कारयचे असे धंदे आम्ही नाही करणार.

भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक, शिवसृष्टी, वढू-तुळपूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, साठी निधी कमी पडू देणार नाही. प्रतापगडाच्या पायथ्याचे अतिक्रमन देखील आम्ही काढले. तर तिर्थक्षेत्रांचा झापाट्याने विकास करण्याचा निर्णय आमच्याच सरकारने घेतला अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube