पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी बारामतीकरांना काय वाटतं?

पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी बारामतीकरांना काय वाटतं?

The decision of Sharad Pawar’s retirement did not go down well with the common man : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषनेंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे. सामान्य माणूसही पवारांच्या निर्णयाविषयी समाधानी नसल्याचं दिसतं आहे. पवार साहेबांनी जो निर्णय घेतला. तो सामान्य कार्यकर्त्याला पटला नाही. त्यांनी तीन दिवसांनी का होईना, त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी बारामतीसह राज्यातील सामान्य कार्यकर्ते, राष्ट्रवादी आणि पवारांचे समर्थक करत आहे.

कुठंतरी थांबण गरजेचं आहे, आता नवी जबाबदारी नको, असं म्हणत त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. पवारांच्या निवृत्तीचा निर्णय हा राजकारण ढवळून काढणारा ठरला. त्यांच्या निर्णयाने कार्यकर्ते, नेते सगळेच अस्वस्थ झाले. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावी, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी केली. मात्र, पवार हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान, पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. बारामतीकरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पवार साहेबांनी जो निर्णय घेतला. तो सामान्य कार्यकर्त्याला पटला नाही. त्यांनी तीन दिवसांनी का होईना, त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा… कारण, 2024 ची निवडणुक पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच लढली जावी, कारण भाजपच्या विरोधात विरोधकांची मोट पवारच बांधू शकतात, असं आम्हाला वाटत असल्यानं त्यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करावा, असं बारामतीकर सांगत आहे.

भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

बारामतीकरांनी सांगितलं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वताला पवारांचे शिष्य मानतात. पवारांवर टीका करणारे उदय सामंतही बारसू प्रकल्पासंदर्भात काय निर्णय घ्यावा, याची चर्चा करण्यासाठी, त्याबाबत सल्ला घेण्यासाठी पवारांना भेटायला येतात. पवारांसारखे अनुभवी नेते राज्याला मिळाले आहेत. दिशादर्शक राज्याचेच नव्हे तर देशाचे दिशादर्शक आहेत. त्यामुळं त्यांनी राजकारणातून त्यांनी निवृत्त होऊ, असं बारामतीकर सांगत आहेत.

पवार साहेब निर्णय घेतील, त्यांनी निर्णय मागे घेतला नाही तर शेतकऱ्यांना कुणी वालीच राहणार नाही. त्यामुळं साहेबांनी निवृत्त होऊ नये, असं वाटतं. महाराष्ट्रातील अठरापगगड जातील समोर घेऊन जाणारे एकमेव नेते आहेत, त्यामुळं ते आपला निर्णय मागे घेतील, असा विश्वास आहे.

कला-साहित्य-राजकारण-समाजकारण या क्षेत्रात त्यांचा कायम वावर असतो. चौफेर जाण असलेलं त्यांचं नेतृत्व आहेत. अशा नेतृत्वाची राज्याला गरज असून त्यांनी आपला निर्णय बदलवावा, अशा प्रतिक्रिया बारामतीकरांनी दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube