Mahesh Tapase : …तर महाविकास आघाडीचे 34 नव्हे 40 खासदार निवडून येतील
मुंबई : ‘इंडिया टूडे सी वोटर आणि मुड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा 40 च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करुन सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ होऊन जाईल असेही महेश तपासे म्हणाले.
उध्दव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती त्यामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना पाचमध्येही स्थान मिळवता आले नाही याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट होत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
आताच लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप- शिंदे गटाचा लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडणार. असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
या सी व्होटरच्या अंदाजाप्रमाणे भाजप आणि शिंदे सेनेला मिळून फार तर 14 जागा मिळतील. परंतु भाजप नेत्यांचा अंदाज त्यांना 48 पैकी 48 जागा मिळतील आणि बारामतीमध्येही पवार कुटुंबास अस्मान दाखवले जाईल. असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. असा हा सर्व्हे आहे.