राष्ट्रवादी विलीनीकरण अन् एनडीएसोबत जाणार का?, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलं क्लिअर
पक्षाच्या विलीनीकरणाबाबत तसंच एनडीएत सामील होण्याच्या चर्चांवरही शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटात फूट पडल्यानंतर आता (NCP) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही फूट पडणार आहे अशी राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे. पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची गुप्त चर्चा झाल्याच्याही बातम्या आहेत. अशातच आज शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. या भेटीची सगळीकडं चर्चा रंगली आहे.
याच भेटीबाबत आता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एनडीएत सहभागी होण्याबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात आमची बैठक कंपली होती. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते. त्यामुळे सर्वांना भेटावं असं ठरलं. योगायोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केबिन जवळ होती. म्हणूनच एकनाथ शिंदेची साहेबांची केबिन घेतली आणि तिथे बैठक झाली. हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे.
Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या कोणत्याही गुप्त बैठका झाल्या नाही…लंकेंकडून त्या दाव्याचे खंडन
त्याचबरोबर, पुढं बोलताना ते म्हणाले पक्षाच्या विलीनीकरणाबाबत तसंच एनडीएत सामील होण्याच्या चर्चांवरही शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. आमच्या पक्षाध्यांनीच सांगितले आहे की विलिनीकरणाची कुठलीही चर्चा नाही. एनडीएसोबत जाण्याची चर्चा नाही. गेल्या तीन- चार दिवसापासून जी चर्चा सुरु आहे तसे काहीच नाही. मी पुन्हा एकदा सांगतो विलिनिकरणाची कुठलीही चर्चा नाही. याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
अधिवेशन सुरू असताना आमदारस खासदार यांच्यासोबत चर्चा करण्याचा पवार साहेबांचा मानस होता. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केलेले नाही. मात्र परिस्थितीची माहिती घेतली आहे. इकडच्या तिकडच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी अतिवृष्टीची माहिती घेतली. बैठकीत विलीनीकरणाची किंवा भाजपसोबत जाण्याचीही चर्चा झालेली नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.