याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना त्रास होणारच !

याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना त्रास होणारच !

नागपूर : ‘मा. मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास श्रीमान संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली.
काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच !’, हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उन्मानी तुम्हाला प्रिय… दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके… म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके ! !’ भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत अशी प्रतिक्रिया दिली.

राज्यात सध्या नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे यादरम्यान मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. मुख्यमंत्री सकाळी साडेदहाच्या सुमारास रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल झाले आणि त्यांना आदरांजली वाहिली. तसंच आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या स्मृतिंनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.

त्यानंतर त्यांच्या या रेशिमबागेत जाण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी यावोळी मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांना त्यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडाची आठवण करून देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते असा सल्लाही दिला आहे. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube