ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये

ANI 20220719264 0_1659262196159_1659262196159_1659754147949_1659754147949

नागपूर : आज विधिमंडळाच्या नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना महापुरूषांचा अपमानप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी महापुरूषांच्या अपमानप्रकरणा पासून ते थेट अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, त्याच प्रबोधनकरांचे वारसदार म्हणविणारे लिंबू फिरवण्याची लिंबू-टिंबूची भाषा करत आहेत. कुठं चाललो आहेात आपण, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.

‘दुःख या गोष्टीचा वाटतंय की, सत्तांतराच्या वेळेस आमच्याबद्दल काहीही बोलले गेले. तसेच आमच्या सोबत असलेल्या महिला आमदारांबद्दल कोणत्याही थराचे बोलले गेले. अजित दादा, तुम्ही काल आम्हाला निर्लज्ज म्हणाले, पण असा निर्लज्जपणा करणाऱ्यांना देखील विचारला गेला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळी सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्या घरी बुलडोझर जायचा, जेसीबी पाठवला जायचा, त्याला जेलमध्ये टाकलं जायचं. कंगना राणावतची घर तोडण्यासाठी महापालिकेचे 80 लाख रुपये वकिलाला देण्यात आले.’

‘हनुमान चालीसा वाचली म्हणून महिला भगिनी खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकण्यात आला पत्रकार राहुल कुलकर्णी, अर्णब गोसावी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन यांच्यावरती देखील मोक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते सध्या बेलवर आहेत. तर काही लोक जेलमध्ये जाऊ शकतात. त्यावेळी त्यांनी काहीही सोडलं नाही मुख्यमंत्री पदाची हवा डोक्यात होती. मुख्यमंत्री म्हणजे आकाशाला हात लागले. देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या सोबत सगळ्यांच्या चौकशी लावण्याचा प्रयत्न केला गेला. अजित पवार आम्हाला म्हणाले की, सत्तेची मस्ती पण तेव्हाही सत्तेची मस्ती नव्हती का ? ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये जातात. त्यांनी आम्हाला कायदा व सुव्यावस्थेबद्दल प्रश्न विचारू नये. तर ज्यावेळी आम्हाला हे सर्व कळाले त्यावेळेस आम्ही तक्तपालटले.’

‘एखादा-दुसरा माणूस चुकू शकतो. पण, ५० लोक कशी काय चुकू शकतात. आमच्या सरकारचं नागपुरातील हे पहिलंच अधिवेशन आहे. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरातील श्रद्धास्थळाला भेट दिली. त्यानंतर काही नेत्यांनी राजकारण करण्याची त्यातही संधी सोडली नाही. ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांड सातत्यावर प्रहार केला. अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, त्याच प्रबोधनकरांचे वारसदार म्हणविणारे लिंबू फिरवण्याची लिंबू-टिंबूची भाषा करत आहेत. कुठं चाललो आहेात आपण ? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.’

Tags

follow us