उद्धव ठाकरे नागपूरात पण सभागृहात मुख्यमंत्र्यांशी ‘सामना’ झालाच नाही

उद्धव ठाकरे नागपूरात पण सभागृहात मुख्यमंत्र्यांशी ‘सामना’ झालाच नाही

विशेष प्रतिनिधी, प्रफुल्ल साळुंखे
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लागणार ही बातमी आली. त्यानंतर विधान परिषद कामकाजात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हा सामना रंगेल का ? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली गेली. पण उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली खरी, प्रत्यक्ष कामकाजात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने आलेच नाहीत. पण पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ठाकरे नागपुरात असे पर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगलेच अलर्ट होते.

उद्धव ठाकरे देखील नागपूर हिवाळी अधिवेशनाला येणार अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे यांचा नागपूर दौरा चर्चेत आला. पहिल्याच दिवशी नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले होते. पहिल्या दिवशी झालेली घोषणाबाजी आणि कामकाजात आणलेल्या अडथळ्यांमुळे सरकार चांगलेच जेरीस आले होते. शिवसेनेबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये देखील एक उत्साहाच वातावरण तयार झालं होत. उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात असल्याने ते काय बोलतात ? कुठे जातात ? यावर सरकारच देखील लक्ष लागलं होते.

काही काळ उपसभापती यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर ठाकरे यांनी कामकाज तेथूनच पाहिलं. शिवसेना नेत्यांसबत संध्याकाळीच ठाकरे यांनी बैठक घेतली होती. त्यानुसार शिवसेना आमदार विधिमंडळाच्या दोन्ही सभगृहात चांगलेच आक्रमक झाले होते. पहिल्या दिवशी ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठका, महाविकास आघाडी नेत्यांसोबत चर्चा आणि पत्रकार परिषद असे भरगच्च कार्यक्रम केले.

पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार, मुख्यमंत्र्यांच्या जमीन घोटाळ्यावर ताशेरे ओढले. महाआघडीचं आक्रमक रूप पाहता मुख्यमंत्र्यांना जमीन वाटपाचा निर्णय मागे घ्यावा लागला. विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे हे किल्ला लढवत होते. कदाचित सभगृहात न बोलता त्यांनी सभागृहाबाहेर पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे हे नागपुरात दीक्षाभूमी येथे नतमस्तक झाले. त्यानंतर अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. एक दिवस दौऱ्यासाठी आलेले उध्दव ठाकरे दोन दिवस नागपुरात ठाण मांडून होते. कदाचित याच दडपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर चांगलेच होते. ठाकरे सभागृहात काही बोलले तर कोण बोलेल ? ते पत्रकारपरिषदेत काय बोलणार ? त्यावर कोण प्रतिक्रिया देईल ? ठाकरे कुठे कोणाला भेटणार ? या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन होते. एकीकडे सभागृहाच कामकाज तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांची नागपूर भेट. या दोन आघाड्यांवर सरकारला लढावं लागलं. सभागृहात मुख्यमंत्री आणि ठाकरे सामना रंगला नसला तरी सभगृह बाहेर चांगलाच चर्चेला आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube