शिवसेना फोडणारा औरंग्याच, ठाकरेंनी फडणवीसांनी दिली औरंगजेबाची उपमा?

शिवसेना फोडणारा औरंग्याच, ठाकरेंनी फडणवीसांनी दिली औरंगजेबाची उपमा?

Uddhav Thackeray On BJP : एका वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं होतं. शिवसेना देवेंद्र फडणवीसांनी फोडल्याचं बोलल्या जातं. अनेकदा त्यांच्यावरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीकाही केली. दरम्यान, आज उबाठाचे नेते उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) औरंग्या जिवंत असून शिवसेना फोडणारा हा औरंग्याच असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. (Uddhav Thackeray On BJP and devednra fadnavis over Aurangzeb)

https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ

आज ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही गटांचा मेळावा झाला यावेळी बोलतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, औरंगजेब अजूनही जिवंत आहे. शिवेसना फोडणारा औरंग्या जिवतं नाहे. औरंगजेब महाराष्ट्रात नाही, तर तो तुमच्या पक्षात आहे. हा औरंगजेब तुमच्यात लपलेला आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता. निदान आमच्या घराण्याचा इतिहास तरी आहे. आमच्या सहा-सात पिढ्या आज जनसेवा करत आहेत. तुम्हाला औरंगजेबाच्या घराण्याचा इतिहास आहे, अशी टीका फडवीसांसह भाजपवर केली.

औरंगजेबाने सती प्रथा बंद केली… काशीच्या पंडितांनी औरंगजेबाच्या राण्या भ्रष्ट केल्या; नेमाडेंची मुक्ताफळे 

ते म्हणाले, ज्या ज्या वेळी हिंदवी स्वराज्यवर अतिक्रमण झालं. औरंगजेबही हिंदवी स्वराज्या संपवायला आलं नाही. तो परत गेला नाही. त्याचं थडगं महाराष्ट्राने बांधलं. अफजलाखानही चाल करून आला होता. त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केली. त्यांची थडगी महाराष्ट्रानं बांधली. औरंग्याची अवलाद महाराष्ट्रात आली तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी मोदी-शाहांना दिला.

आम्ही स्वताहून कुणावर वार करत नाही. मित्र म्हणून मिठी मारली अन् तुम्ही पाठीत वार करणार असाल तर आम्हाला कोथला बाहेर काढावीच लागेल, असंही ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या हिंदुत्ववादी नेत्याच्या काळात हिंदूंना मोर्चे काढावे लागतात हे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट वाटते. त्याचं झालं असं की सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही. काही लोक म्हणतात की आता ते काँग्रेस फोडणार आहेत. मग दुसरा उपमुख्यमंत्री करावा लागेल. फडणवीस मग मस्टरमंत्री राहणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मणिपुरमध्ये झालेल्या हिंसाचाराचावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. मोदी मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घेतात,पण मणिपुरच्या महिलांकडून राखी बांधून घेण्याची ताकत त्यांच्यात आहे का? असा थेट सवाल केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube