Jaydutt Kshirsagar beed : जयदत्त क्षीरसागरांकडून भाजपचा वापर; पुतण्या संदीप क्षीरसागरांचा काकांवर गंभीर आरोप

  • Written By: Published:
_LetsUpp (1)

बीड: बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद सर्वश्रुत आहे. माञ सध्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भाजपसोबत जवळीक वाढलीय आणि यावरूनच पुतण्या आमदार संदीप क्षीरसागरांनी काकांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. काका जयदत्त क्षीरसागरांकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जातोय. ज्यांच्याकडे सत्ता त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलंय. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं. असं आव्हान पुतण्या संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिल आहे.

काका जयदत्त क्षीरसागरांकडून भाजप आणि भाजपमधील नेत्यांचा वापर केला जात आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी आता इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर यावं असं खुलं आव्हान पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना दिले आहे.

काकांची भाजपबरोबर जवळीक वाढत आहे. माझ्यासहित बीड मतदार संघात इतरांना देखील हा प्रश्न पडला आहे की ते आहेत कुठे आणि त्यांची भूमिका काय, कारण राजकारणात भूमिका ही स्पष्ट असावी लागते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केला आहे. हा त्यांचा इतिहास आहे, असे देखील संदीप क्षीरसागर यावेळी म्हणाले आहेत.

Tags

follow us