आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींना घाबरलो नाही, त्यांना घाबरण्याचा काय विषय

आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींना घाबरलो नाही, त्यांना घाबरण्याचा काय विषय

नागपूर : शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 19 डिसेंबर 2022 ते दिनांक 30 डिसेंबर 2022 दरम्यान नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना चांगलेच घेरले. यामध्ये भाजपकडून ठाकरे गटावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणावरून घेरण्यात आलं.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. ‘या अधिवेशनात गद्दार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येऊ नये म्हणून आम्हाला बोलू दिले नाही. तर माझ्यावर दिशा सालियान प्रकरणावरून आरोप करणे म्हणजे राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी होते’. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ’32 वर्षांच्या तरूणाला खोके सरकार घाबरले’. असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे- फडणवीस सरकारवर केला.

शुक्रवारी नुकतच राज्याचं हिवाळी अधिवेशन समाप्त झालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या ’32 वर्षांच्या तरूणाला खोके सरकार घाबरले’. या टीकेला उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही त्यांच्या पुज्य पिताश्रींना घाबरलो नाही. मग, त्यांना घाबरण्याचा काय विषय आहे. त्यांच्या नाकाखालून ५० लोकं निघून आले, ते काहीच करु शकले नाहीत. तेव्हा सांगत होते, मुंबई पेटणार, मुंबईला आग लागणार. आग सोडा माचीसची काडी सुद्धा जळली नाही. कारण, लोकांना पटलं होतं, ह्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. एकनाथ शिंदे करत आहेत, ते बरोबर आहे. त्यामुळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले.’ असं उत्तर आदित्य ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube