वंचित आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; पवार थेट बोलले

वंचित आणि राष्ट्रवादी एकत्र येणार? आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; पवार थेट बोलले

We will take what stand we want to take, Ajit Pawar, Pawar’s statement on party split : काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गट (उद्धव ठाकरे) एकत्र आले होते. त्यानंतर वंचित महाविकास आघाडीत येणार का, अशा चर्चांना उधाण आलं होतं. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती. पण, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकलं नाही. दरम्यान, वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये येणार का, यावर उत्तर देतांना पवार यांनी त्यांच्याशी भेट ही कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने झाल्याचे सांगितले.

पवार म्हणाले, आमची आंबेडकरांनी चर्चा झाली. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेगळ्या असतील, तर सहकार्य करता येईल का, याबाबत चर्चा झाली. आंबेडकर त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडे पाठवणार आहेत. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल, त्यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, असं पवार म्हणाले.

राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. यावर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं परखड मत व्यक्त केलं. अजित पवार यांना फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे विचारताच पवार यांनी याला नकार दिला. परंदू, जे वक्तव्य केलं आहे, यावरून राजकीय अर्थ काढले जात आहेत.

Devendra Fadnvis : राजकारणातले काही लोकं नशा करुन सकाळीच कुस्ती खेळताहेत…

कोणी राष्ट्रवादी पक्ष फोडायचे काम करत असेल तर ती त्यांची रणनीती असेल, त्यांची भूमिका असेल. आम्हाला काय भूमिका घ्याची ते आम्ही घेऊ, असं वक्तव्य शरद पवार यांनी करत तसे प्रयत्न करणाऱ्यांना एकप्रकारे तंबीच दिली आहे.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी कर्नाटक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या अनुषंगाने ही भेट झाल्याचं पवारांनी सांगिलते. त्यामुळं आता राज्यातही वंचित आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जाणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube