बंडखोरी, राज्यभर दौरा अन् जाहीर सभेत टीका; शरद पवारांच्या मनात नेमकं काय? रोहित पवारांनी सांगितलं

बंडखोरी, राज्यभर दौरा अन् जाहीर सभेत टीका; शरद पवारांच्या मनात नेमकं काय? रोहित पवारांनी सांगितलं

Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर कंबर कसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आहे. अजित पवारांसह समर्थकांनी घेतलेल्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी अजित पवार गटावर फारसं भाष्य केलेलं दिसत नाही. याउलट ते पक्षाच्या उभारणीसाठी जिल्ह्या-जिल्ह्यांत दौरे करुन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? अजित पवार गटावर ते अधिक का बोलत नसतील? गोष्टी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितल्या आहेत.

काँग्रेसनं वर्किंग कमिटीत का डावललं? आनंदात असणाऱ्या मित्रांना थोरातांचं थेट उत्तर

आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांचा 60 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. जिथे भाजपचा राजकारणाचा विचार संपतो, तिथून शरद पवार साहेबांचा विचार सुरु होतो. भाजपने कुटुंब फोडलं, आमचा पक्ष फोडला. केवळ राष्ट्रवादीच नाहीतर शिवसेनाही फोडली, असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

Onion Price : दोन दिवसांचाच कांदा खरेदी कराल; उर्वरित कांद्याचे करायचे काय? तुपकरांचा सरकारला सवाल

तसेच ज्या शक्तीने ताकद लावून या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना सोडून काय करायचे, उलट मुळावरच वार होणे गरजेचे असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यावर आधीपासूनच पुरोगामी विचारांचा पगडा असून शरद पवार असो किंवा रोहित पवार आम्ही सर्व येथे फक्त कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. इथल्या कार्यकर्त्यांचीच ताकद जास्त असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष केलं आहे.

Raju Punjabi: ‘देसी देसी न बोल्या कर’ फेम प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांचे निधन 

दरम्यान, राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांनी नाशिकमधील येवल्यात अर्थात भुजबळांच्या बालेकिल्यात कार्यंकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर अजित पवार गटावर अधिक बोलणं टाळल्याचं दिसून आलं. आता राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीसाठी ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांसोबत छोटेखानी सभा घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वाभिमान सभेची सुरुवात बीडमधून केली आहे. आता येत्या 25 ऑगस्टला राष्ट्रवादीची कोल्हापुरात सभा होणार आहे. विशेष म्हणजे या सभेला छत्रपती शाहु महाराज यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube