अध्यक्ष होण्यापूर्वी सुप्रिया सुळेंना ‘पक्षाच्या घटनेचा’ अडथळा; पाहा, काय आहेत अटी

अध्यक्ष होण्यापूर्वी सुप्रिया सुळेंना ‘पक्षाच्या घटनेचा’ अडथळा; पाहा, काय आहेत अटी

NCP New President : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठा पेच निर्माण झाला होता. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलावा यासाठी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी विनंती करत आहेत. आता राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढं येते आहे.

कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी एक घटना असते. आता राष्ट्रवादीची घटना नेमकं काय सांगते ते पाहुया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिक्त झालेल्या सदस्यांची समिती स्थापन करावी असं पवार यांनी सुचवलं आहे. समितीमध्ये कोण सदस्य असावेत त्यांची नावेही शरद पवार यांनी सुचवली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत 5 मे रोजी बैठक घेणार आहेत. पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल ते आपल्याला मान्य असेल असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Maharashtra BJP : नव्या कार्यकारिणीत आमदार-खासदारांना डच्चू, पाहा, काय आहे गणित

राष्ट्रवादीच्या घटनेत काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येकी 3 वर्षांनंतर नव्या अध्यक्षाची निवड होत असते. आठ महिन्यांपूर्वीच शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. अध्यक्षांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेते. राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती निवडणूक घ्यायची की नाही याबाबत चर्चा करेल असं नमूद करणयात आलं आहे.

Prithviraj Chavan : काँग्रेससोबतच्या ‘त्या’ वादावादीने शरद पवारांची पहाटेच्या शपथविधीला सहमती

प्रभारी अध्यक्षाची नेमणूक करण्याची तरतूद
या दोन्ही समितीला राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता परस्पर चर्चा करुन निर्णय घेण्याचा अधिकार आहे. दोन्ही समितीमध्ये अध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली तर राष्ट्रीय कार्यकारिणीची तात्काळ बैठक बोलवली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता एकमुखी निर्णय घेऊ शकतात. कमिटीला तसा अधिकार देण्यात आला आहे. समिती शिफारस करेल त्या नावावर शिक्कामोर्तब करणयात येईल. राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत समिती प्रभारी अध्यक्षदेखील नेमू शकते.

अशी होते अध्यक्षाची घोषणा…
राष्ट्रीय अधिवेशन पार पडल्यानंतर अध्यक्षपदाची घोषणा अधिवेशनात केली जाईल. राष्ट्रीय कार्यकारणी समितीला विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ पक्ष हितासाठी प्रभारी अध्यक्ष न नेमता थेट अध्यक्ष नेमण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube