टारगेट करून दलित, ओबीसींची नावे वगळली; हायड्रोजन बॉम्ब न फोडता राहुल गांधींचा नवा धमाका

कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली. फक्त १४ मिनिटांत १२ मते वगळण्यात आल्याचेही आम्हाला तपासात आढळून आले.

  • Written By: Published:
टारगेट करून दलित, ओबीसींची नावे वगळली; हायड्रोजन बॉम्ब न फोडता राहुल गांधींचा नवा धमाका

Rahul Gandhi PC On Vote Chori :  काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते. मात्र, आजच्या प्रेसमध्ये राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हायड्रोजन बॉम्ब फोडण्याऐवजी मत वगळण्याचे पुरावे सादर केले. दलित आणि ओबीसी मतदारांची नावे लक्ष्य करून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींचा ‘मत चोरी’वर (Vote Chori) नव्याने केला आहे. हा हायड्रोजन बॉम्ब नाही, हायड्रोजन बॉम्ब येणार असल्याचेही राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.ते म्हणाले की, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्या आणि मते चोरणाऱ्यांना संरक्षण देत आहेत.

मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा म्हणणार नाही, पण काही लोक… पवारांचा भागवतांना टोला अन् मोदींची पाठराखण

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, आमच्या तपासात असे आढळून आले आहे की, आयोगाने मतदारांची नावे टारगेट करून काढून टाकली आहेत. आज मी तुमच्यासोबत जे काही शेअर करत आहे ते पुराव्यांवर आधारित आहे. आयोगाने दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करत असून, या लोकांची नावं मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची मते रद्द झाली आहेत त्यांनाही याची माहिती नाही. Rahul Gandhi PC On Vote Chori

कर्नाटकात 12 मिनिटात 14 नावे वगळली

राहुल गांधी पुढे म्हणाले की, कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली. फक्त १४ मिनिटांत १२ मते वगळण्यात आल्याचेही आम्हाला तपासात आढळून आले. यावरून स्पष्ट होते की, निवडणूक आयोग (Election Commission Of India) मतदान चोरांना संरक्षण देत आहे. आतापर्यंत आयोगाने लाखो मतदारांना लक्ष्य केले आहे आणि यादीतून वगळले आहे. कर्नाटकात जाणीवपूर्वक मते वगळण्यात आल्याचेही राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्यांची मते रद्द केली जात आहेत. सॉफ्टवेअरद्वारे मत रद्द करण्याचे अर्ज करण्यात आले आहेत. कर्नाटकाबाहेरील फोन नंबर वापरून मते वगळण्यात आली आहेत. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने १४ मिनिटांत १२ मत रद्द करण्याचे फॉर्म भरल्याचेही राहुल गांधींनी सांगितले.

मोठी बातमी : ईव्हीएमवर दिसणार आता उमेदवारांचे रंगीत फोटो; निवडणूक आयोगाची घोषणा

महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातही मते वाढली

महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात 6850 मते वाढवण्यात आल्याचे सांगत अशाच पद्धतीने मते वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही असे घडल्याचे ठोस पुरावे त्यांच्याकडे असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. निवडणूक आयोगाने कर्नाटक सीआयडीला एका आठवड्यात मते वगळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रमांकांची आणि उपकरणांची माहिती द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

follow us