Amol Kolhe : अमोल कोल्हेंना जवळ कोण? भाजप की राष्ट्रवादी

प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
मुंबई : संसदेच्या बजेट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. राज्यातले महत्वाचे प्रश्न संसदेत मांडले जावेत यासाठी दरवर्षी या बैठकीची प्रथा आहे. या बैठकीला महा आघाडीच्या खासदार यांनी गैरहजेरी लावली. पण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावत, सध्या आपल्याला राष्ट्रवादी पेक्षा भाजप जवळ असल्याचे संकेत कोल्हे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र मधील प्रश्नासाठी ही बैठक बोलावली गेली. पण प्रश्न पेक्षा बैठक अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या उपस्थिती मुळे गाजली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे , काँग्रेस चे बाळू धानोरकर, सेनेचे विनायक राऊत, राजन विचारे, खासदार अरविंद सावंत यांच्या सह राज्यसभा सदस्य शरद पवार, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, अनिल देसाई, प्रियांका शर्मा या सर्व खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
पण बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे मात्र उपस्थित होते. महा आघाडीने अघोषित बहिष्कार टाकला असताना कोल्हे यांची उपस्थिती चर्चेचा विषय होती. गेल्या काही दिवसापासून अमोल कोल्हे भाजपाच्या जवळ असल्याच्या अनेक प्रकरण समोर आली.
सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हे यांची स्तुती केली त्यावेळी कोल्हे भाजपा मध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. या नंतर झालेल्या स्थानिक पातळीवर अनेक राष्ट्रवादीं काँग्रेस बरोबर कोल्हे फारकत घेणार यावर ही मंथन झाले.कोल्हे यांनी पक्षादेश डावलला का? थेट उपस्थिती लावून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला संकेत दिलेत का? यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरू झाले आहेत.