Bhagat Singh Koshyari : उद्धव ठाकरेंचे शकुनीमामा कोण ? कोश्यारींनी सांगितलं…
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. कोश्यारी यांना यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी पत्र लिहिलं त्यावर मला थोडा संयम राखा असं गृहमंत्र्यांचं उत्तर आलं होत. मात्र त्यानंतर मला उद्धव ठाकरे यांनी जे पत्र होत ते कोणत्या नियमांमध्ये बसतं.
Sharad Pawar : पवारांनी लवासाबद्दल दहावेळा विचार करायला पाहिजे – भगतसिंह कोश्यारी
‘उद्धव ठाकरे सज्जन व्यक्ती आहेत. ते राजकारणात अडकले आहेत. ते अशा प्रकारचं पत्र लिहून फसले आहेत. कराण ते सरळ, सज्जन, नसते राजकारणी असते शरद पवारांसारखी ट्रिक माहीत असत्या, अनुभव असता तर त्यांनी पत्र लिहीलं नसतं. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना माझे राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. पण उद्धव ठाकरेंना सल्ला देणारे कोण होते ? त्यांचे आमदार मला येऊन सांगत होते की, आम्हाला वाचवा उद्धव ठाकरेशकुनी मामाच्य जाळ्यात अडकले आहेत. पण माहीत नाही उद्धव ठाकरेंचे शकुनीमामा कोण ? असं यावेळी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, त्यांनी शकुनीमामा हा टोला अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना लगावला आहे.
त्याचबरोबर शरद पवारांचं लवासाचं प्रकरण हायकोर्टात आहे. त्याबद्दल त्यांनी दहावेळा विचार करायला पाहिजे. ते मोठे व्यक्ती आहेत मी त्यांचा सन्मान करतो. पण ते जे काही बोलतात तो राजकीय असंत. असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जे राजकारणी आहेत, नेते आहेत, चिंतक आहेत ते विचार करत असतील हे कसं काय झालं ? कधी-कधी अशा गोष्टी एका क्षणात घडतात तर एका रात्रीचं काय एका क्षणात भूकंप येऊ शकतो. पण हा पहाटेचा शपथविधी एका रात्रीत झालेला नाही.
या दोन्ही नेते माझ्याकडे आले. कागद पत्रांवर त्यांच्या सह्या आहेत. ते काही छोटे-मोठे नेते नाहीत. अजित पवार देखील एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. ते माझ्याकडे आले तर मी म्हणालो तुमच्याकडे बहुमत आहे तर सिद्ध करा. सिद्ध कारायला वेळ देखील दिला. पण त्यानंतर कोर्टाने हा वेळ कमी करायला सांगितला. तर हा वेळ कमी करण्यात आला. पण त्यांच्याकडे बहुमत नव्हत त्यांनी राजीनामाही दिला. हे सर्व सामान्य होतं. असं यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हणाले.