उर्फीला महिला आयोगानं जाब का नाही विचारला ? चित्रा वाघ यांचा सवाल

उर्फीला महिला आयोगानं जाब का नाही विचारला ? चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई : ‘भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत जाब का नाही विचारला ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो… कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? #सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध.’ अशी टीका भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

या अगोदर देखील चित्रा वाघ यांनी ‘शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला @MumbaiPolice कडे IPC/CRPC आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ अशी टीका उर्फी जावेद या अभिनेत्रीबद्दल केली होती.

त्यानंतर त्यावर सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न देखील उपस्थित केले. जर अल्पसंख्यांक उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube