अचानक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक का बोलावली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या घोषणनेे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. शरद पवारांचा हा निर्णय याआधीच ठरला असल्याची माहिती आता समोर आलीय. राष्ट्रवादीच्या सर्वच जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर आता ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन निवृत्ती घेऊ नका, असं आवाहन केलं आहे.
त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, युवा अध्यक्षांची आज संध्याकाळी बैठक पार पडणार आहे.राष्ट्रवादीकडून अचानक ही बैठक का बोलवली असावी? याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकीकडे काही कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या राजीनाम्याचा विरोध केला जात असून दुसरीकडे काहीतरी मार्ग काढणार असल्याची भूमिक विरोधी पक्षनेते अजित पवार घेताना दिसून येत आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. शरद पवारांकडून उपोषणकर्त्यांना विनंती करण्यात आली असून तुम्ही जेवण करुन घ्या, उपोषण करु नका, मार्ग काढू अशी विनंतीही करण्यात आली आहे.
आज सायंकाळी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला सर्वच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नव्या नेतृत्वाबाबत कुणकुण होती पण थेट शरद पवार राजीनामा देतील हे अनपेक्षित होते. राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कमिटीचे सर्व पदाधिकारी बैठक घेणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
The Kerala Story : ३२,००० मुलींचं धर्मातर ? वादात असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ची स्टोरी खरी आहे का ?
ही बैठक सिल्व्हर ओक इथं होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत वरिष्ठ नेतेमंडळीच उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतरच जिल्हाध्यक्षांची मतं जाणून घेतले जाणार आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असून नव्या अध्यक्षाबाबत राष्ट्रवादीची समिती ठरवणार असल्याचं समोर आलंय. आता नवा अध्यक्ष कोण होऊ शकतं? याविषयी समितीकडून चाचणी करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.