The Kerala Story : ३२,००० मुलींचं धर्मातर ? वादात असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ची स्टोरी खरी आहे का ?

  • Written By: Published:
The Kerala Story : ३२,००० मुलींचं धर्मातर ? वादात असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ची स्टोरी खरी आहे का ?

मागच्या आठवड्यात एका पिक्चरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘द केरळ स्टोरी’ (the kerala story)

The Kerala Story चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ३२ हजार मुलींच्या गायब होण्याची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. अदा शर्मा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. केरळमधील हजारो मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना ISIS चे दहशतवादी बनवल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा ‘द केरळ स्टोरी’चा टीझर रिलीज झाला होता, तेव्हापासून मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा होत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला अदा शर्मा म्हणते की ती केरळची शालिनी उन्नीकृष्ण आहे. तिला पोलीस विचारत आहेत की, ती ISIS मध्ये कधी सामील झाली. त्यावर उत्तर देताना शालिनी म्हणते की, ती ISIS मध्ये कधी सामील झाली हे जाणून घेण्यासाठी ती का सामील झाली, कशी सामील झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला अदा शर्मा म्हणजे शालिनीसोबत आणखी तीन मुली दिसत आहेत. दोन हिंदू आणि एक मुस्लिम. त्यातली मुस्लिम मैत्रीण सांगते की अल्लाह हाच खरा देव आहे. एकप्रकारे धर्म परिवर्तनाची झलक दाखवली आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर 1 कोटींचे बक्षीस… पण ‘ही’ असेल अट

सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे. चित्रपटाचा टीझर २ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केरळमध्ये निष्पाप मुलींचे धर्मांतर केले जात असल्याचा दावा या टीझरमध्ये करण्यात आला होता.

चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी सांगितले की, या चित्रपटात केरळमधील कट्टरतावादासारखा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतरच बराच गदारोळ झाला आणि लोकांनी चित्रपटाची कथा खोटी असल्याचे सांगितले आहे. तर काही लोकांनी हा आकडा खोटा असल्याच सांगितलं आहे.

32,000 मुलींचा आकडा किती खरा?

प्रश्न असा आहे की 32,000 हा आकड्याचा दावा किती खरा आणि किती खोटा? जानेवारी 2022 मध्ये NIA ने उघड केले होते की इस्लामिक स्टेटचे स्लीपर सेल केरळमध्ये सक्रिय आहेत. त्यावेळी आठ दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. केरळमधील मुस्लिम तरुणांना दहशतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा एनआयएने केला आहे. यामध्ये महिलांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात आले होते.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

पण 32 हजार मुलींच्या धर्मांतराचा आकडा कुठून आला? असा प्रश्न The Kerala Story चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सुदीप्तो म्हणाले की 2010 मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेसमोर अहवाल ठेवला होता. ते म्हणाले होते की दरवर्षी सुमारे 2,800 ते 3,200 मुली इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. यावरून पुढील 10 वर्षांचा हिशोब करा. ही संख्या 30 ते 32 हजार आहे.

पण मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी कॅमेरासमोर मात्र हा दावा नाकारला होता, असं देखील सुदीप्तो सांगतात. सुदिप्तो सेन यांनी फॅक्ट चेकर वेबसाइट Alt News शी बोलताना 32 हजारांच्या आकड्याबाबतही हाच दावा केला आहे. हा आकडा त्यांचा नसून ओमन चंडीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते ओमन चंडी ?

केरळमध्ये ओमन चंडी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात धर्मांतराचे आकडे समोर आले होते. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होत. ते म्हणाले होते, आकडेवारीनुसार 2006 ते 2012 या कालावधीत 7713 लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. 2009 ते 2012 या वर्षात धर्मांतरित झालेल्या लोकांपैकी 2667 महिला होत्या. त्यापैकी 2195 तरुण हिंदू मुली आणि 492 तरुण ख्रिस्ती मुली होत्या. त्यावेळी सीएम चंडी यांनी विधानसभेत असेही सांगितले होते की 2006 ते 2012 या काळात 2803 लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. याशिवाय 2009 ते 2012 या काळात 79 मुलींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि दोन मुलींनी हिंदू धर्म स्वीकारला.

येत्या ५ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यावरून राजकारण तापलं आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यानी हा केरळला बदमान करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे. येत्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यावेळी त्याची खरी कहाणी समोर येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube