Balasaheb Thorat यांना भाजपात प्रवेश देणार का ? बावनकुळे म्हणतात…

  • Written By: Published:
Balasaheb Thorat यांना भाजपात प्रवेश देणार का ? बावनकुळे म्हणतात…

कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of Legislative Group Leader)दिल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये (congress) अंतर्गत वाद सुरु होता.

नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले (Nana Patole)यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांची तक्रार थेट पक्षाच्या हायकमांडकडे केली होती. त्यातच आता त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे दिल्ली हायकमांड थोरांताच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बाळासाहेब थोरातांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपात कोणालाही यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करतो. आमचा राजकीय पक्ष असून पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा इतर कोणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर आम्ही त्यांचा मान-सन्मान ठेवून त्यांना प्रवेश देत असतो.

पण पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, “पण थोरात भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही. कारण थोरातांच्या रक्तात काँग्रेस आहे. त्यांचे काँग्रेस वाढविण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. ज्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी काँग्रेसला सावरले होते.”

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube