NCP : राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार ? संविधानिक पद असलेल्या महिला नेत्या पक्ष सोडणार ?

  • Written By: Published:
NCP : राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार ? संविधानिक पद असलेल्या महिला नेत्या पक्ष सोडणार ?

पुणे : संविधानिक पदावर असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सत्तेच्या वर्तुळात सुरु आहेत. आपले पद वाचवण्यासाठी त्या प्रवेश करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात मुंबईच्या वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या भाजप नेत्यांसोबत मुंबईत दोन बैठका झाल्याचीही चर्चा आहे. 

या महिला नेत्यांनी राज्य संघटनेचे देखील पद सांभाळले होते. मात्र घटनात्मक पदावर निवड झाल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. या महिला नेत्या ज्या पदावर काम करत आहेत, त्या संस्थेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले आहे. 

सत्ताबदल होऊनही पद कायम 

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही त्यांचे पद कायम राहिल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. सत्ताबदल होऊनही पद कायम राहिल्याने त्यांच पद जाणार असल्याची चर्चा होती. पण त्यांचे पद कायम राहिले. आपले पद वाचवण्यासाठीच त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  

चित्रा वाघ यांच्याशी जुळवून घेणार ?

या महिला नेत्याची चित्र वाघ यांच्याशी आधीपासून वाद आहे. २०१९ पूर्वीच त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश टाळला होता. पण आता त्या पुन्हा भाजपात प्रवेश करणार तर त्या चित्रा वाघ यांच्याशी जुळवून घेणार का ? असा प्रश्न आहे. 

आजच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सगळे राजकीय धक्के २०२४ नंतर देणार असं म्हटलं होत, त्यातच अशी बातमी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube