पुणे रेल्वे स्थानकात मोठी कारवाई; गुजरातमधील व्यक्तीकडून 51 लाख रुपये जप्त

Pune RPF  : पुणे आरपीएफने 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करत गुजरातमधील एका व्यक्तीकडून तब्बल 51 लाख

  • Written By: Published:
Pune RPF Photo

Pune RPF  : पुणे आरपीएफने ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करत गुजरातमधील एका व्यक्तीकडून तब्बल 51 लाख रुपये जप्त केले आहे. पुढील चौकशीसाठी या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पुणे आरपीएफकडून देण्यात आली आहे. फरदीनखान जफरउल्ला खान मोगल (वय 24 वर्ष, रा. मेहसाणा गुजरात) असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त व सहाय्यक सुरक्षा आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे आरपीएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे स्थानकावरील BSM (Baggage Scanner Machine) वर सामान तपासणीदरम्यान फरदीनखान जफरउल्ला खान मोगल (वय 24 वर्ष, रा. मेहसाणा गुजरात) या तरुणाकडे दोन बॅगा आढळल्या. त्या दोन्ही बॅगांमधून एकूण 51 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. पैशांबाबत समाधानकारक माहिती देण्यात फरदीनखान जफरउल्ला खान मोगल अपयशी ठरल्याने त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे . त्याच्याकडे आढळलेल्या एका जांभळ्या रंगाच्या बॅगेतून अंदाजे 22 लाख रुपये आणि लाल रंगाच्या बॅगेतून अंदाजे 29 लाख रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती आरपीएफकडून (Operation Satark) देण्यात आली आहे.

Surya Grahan 2025 : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात दिसणार का? जाणून घ्या सर्वकाही

जप्त रोख रक्कम व संबंधित व्यक्ती यांना आवश्यक कार्यवाहीसाठी विधिवत आयकर विभाग, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील चौकशी आयकर विभाग करीत आहे. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभाये, एएसआय विलास दराडे, एएसआय संतोष पवार तसेच एमएसएफ स्टाफ कृष्णा भांगे यांनी केली.

follow us