जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे 8 वा श्रीमद् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव

Jadhavar Group of Institutes ठव्या श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Jadhavar Group Of Institutes

8th Shrimad Bhagwat Bhakti Katha Gyan Yagya Festival organized by Jadhavar Group of Institutes : शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना भागवत कथा, कीर्तन व प्रवचनाद्वारे प्रबोधनाकरीता न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे आठव्या श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृंदावन धाम, संत शिवाई माता संस्थान श्री क्षेत्र शिऊर येथील भागवताचार्य श्रद्धेय स्वामी पंढरीनाथ महाराज शास्त्री हे दिनांक 31 मे ते 6 जून दरम्यान दररोज सायंकाळी 5 वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल 1 च्या प्रांगणात भागवत कथा निरुपण करणार असल्याची माहिती इन्स्टिटयूटस् चे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.

दादरच्या मराठी डॉक्टरांची ऐतिहासिक झेप; डॉ. नितीश राऊत ब्रिटनमध्ये महापौरपदी विराजमान

ज्ञानयज्ञ महोत्सवाचा प्रारंभ रविवार, दिनांक 31 मे रोजी दुपारी 4 वाजता भागवत ग्रंथाच्या भव्य मिरवणुकीने होणार आहे. भागवत कथा प्रासंगिक दृश्यांसह संगीतमय पद्धतीने सादर होणार आहे. यामध्ये दररोज सायंकाळी 5 ते रात्री 8 यावेळेत कथाभाग होणार असून गणेश पूजन, नारद भक्ती संवादापासून ते कृष्ण-सुदामा संवादापर्यंत सर्व कथाभाग विस्तृतपणे कथन केला जाणार आहे.

सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निश्चित…’या’ ठिकाणी होणार अद्यावत कॉलेज

महोत्सवाची सांगता शनिवार, दि. 6 जून रोजी सकाळी 6 ते 8 यावेळेत परिक्षीती उद्धार व समाप्ती तसेच सकाळी 10 वाजता शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प.गुरुवर्य राजेंद्र महाराज येप्रे यांचे काल्याचे कीर्तन याने होईल. त्यानंतर दुपारी 12 ते 2 यावेळेत महाप्रसाद होणार आहे. सुरेखा जाधवर, अंजली येप्रे, लक्ष्मीछाया हुले, शीतल तळेकर, लता गांदले, शोभा पाटील, डॉ.महालक्ष्मी मोराळे, विजया जाधवर, सुरेखा गायकवाड, मंजुश्री हुले यांसह ह.भ.प.येप्रे महाराज साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ न-हेगाव यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे.

NEET ची परीक्षा, लष्कराची सुरक्षा! ‘भारतीय लष्कराला पाचारण करणार’, शिक्षणमंत्र्यांची घोषणा…

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त व अधिक मासाच्या निमित्ताने जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या आठव्या श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात. https://youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या लिंकवरुन महोत्सवाचा आनंद घेता येईल.

follow us