आषाढी वारी 2023 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर, असा असणार दिनक्रम
Aashadhi Vari 2023 : आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशी असते. या वारीला भागवत धर्म आणि वारकऱ्यांकडून विशेष महत्त्व असतं. ही मोठी वारी असल्याने आषाढी वारीला पंढरपुरात मोठा सोहळा आणि राज्यभर याचा जल्लोष असतो. संतांच्या पालख्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट घेतात.
राज्यातील अशा अनेक पालख्या विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट घेतात. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही मानाच्या पालख्यांपैकी एक असते. आळंदी ते पंढरपूर असा या पालखीचा प्रवास असतो. तर यामध्ये विविध ठिकाणी मुक्काम, रिंगणा सोहळा, वारकरी, पंगती अशा थाटात माऊलींची पालखी पंढपूरात दाखल होत असते.
माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो, जिवीताला नाही; ‘त्या’ तक्रारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण
दरम्यान आषाढी वारी 2023 म्हणजे यंदाच्या आषाढी वारीला माऊलींची पालखी पंढपूरला विठ्ठलाच्या भेटीला रवाना कधी आणि कशी होणार याचं एक वेळापत्रक जाहीर झालं आहे. रविवार, 11 जून 2023 ते सोमवार, 3 जुलै 2023 या दरम्यान आळंदी ते पंढरपूर असा माऊलींच्या पालखीचा प्रवास असणार आहे. तर 3 जुलैला पुन्हा आळंदीला परतण्यासाठीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्याकडून हे आषाढी वारी 2023 चं ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.