पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, अजित पवारांनी महिला प्रवक्त्यांना घेतलं फैलावर

Ajit Pawar यांनी पक्षाची प्रतिमा खालावण्याचे काम करण्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील महिला प्रवक्त्यांना फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar Chintan Shibir

Ajit Pawar lashes out at Pune women spokespersons, says those tarnishing party’s image will be sidelined : राज्यामध्ये सध्या सर्व राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला कंबर कसून लागले आहेत. त्यात विविध सभा बैठकांच सत्र सुरू आहे. त्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार पुण्यात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाची प्रतिमा उंचावण्याऐवजी खालावण्याचे काम करण्याच्या मुद्द्यावरून पुण्यातील महिला प्रवक्त्यांना फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाले अजित पवार?

काही प्रवक्ते पक्षाची प्रतिमा उंचावण्याऐवजी खालावण्याचे काम करत आहेत. त्यांना आता मायनस करावे लागेल. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार पुण्यातील महिला प्रवक्त्यांवर बरसले. महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्या वादाच्या संदर्भातून अजित पवारांनी या कानपिचक्या दिल्याची चर्चा होती. मुंबई येथील वरळी येथे महापालिका निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी काही पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

कानावर आलं तेव्हा स्पष्ट सूचना दिल्या होत्या पण… जमीन खरेदी अजित पवारांना खटकलं पण पार्थ यांनी रेटलं

पुण्यात सध्या रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद सुरू आहे. रूपाली पाटील यांच्याकडून चाकणकर यांच्यावर टीका केली जात आहे. या संदर्भातून अजित पवार म्हणाले, पक्षीय भूमिका आणि ध्येय धोरणे मांडण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रवक्त्यांची नियुक्ती आहे. पण काही भगिनी ते विसरल्या आहेत. स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी आणि लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्याकडून वक्तव्ये केली जात आहेत. थांबायचे नावच त्या घेत नाहीत. यामुळे पक्षाची प्रतिमा उंचावण्याऐवजी खालावली जात आहे. त्यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या प्रवक्त्याना मायनस करावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुण्यातील दोन महिला नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ट नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत नव्हती. आता थेट अजित पवार यांनीच भाष्य केल्याने कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

 

follow us