“हवा प्रदूषित आता पाणीही दूषित… पुणेकरांनी श्वास घ्यायचा कसा, प्यायचं काय?” नगरसेवक अमोल बालवडकरांचा सवाल

Amol Balwadkar on Khadakwasla Dam Water; खडकवासला धरणातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप करत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चिंता व्यक्त केली.

Amol Balwadkar on Khadakwasla Dam Water Pollution

Amol Balwadkar on Khadakwasla Dam Water Pollution: खडकवासला धरणातील जलस्रोतांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धरण परिसरातील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत त्यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज अवैध, कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय

सांडपाणी सोडणाऱ्या आस्थापनांवर कारवाईची मागणी

खडकवासला परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी आणि कुडजे या गावांमधील काही व्यावसायिक आस्थापनांमधून धरणाच्या जलस्रोतांमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप बालवडकर यांनी केला आहे. या प्रकाराची नियमित तपासणी करण्यासाठी धरण परिसरात गस्त घालावी, सांडपाणी कुठून आणि कशा प्रकारे सोडले जाते, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच, ज्या आस्थापनांना नियमांनुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारणे बंधनकारक आहे, त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी करून घ्यावी. प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित निकषांनुसारच सोडले जात असल्याची खात्री करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमाला दांडी मारणे महागात; पुण्यात भाजपच्या शंभर नगरसेवकांना नोटीस…

ग्रामपंचायतींना निधी देण्याची मागणी

धरण परिसरातील गावांमधील सर्वसामान्य ग्रामस्थांना या समस्येसाठी दोष देणे योग्य नसल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले. गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासनाने संबंधित ग्रामपंचायतींना सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अमोल बालवडकर यांचे नेमके म्हणणे काय?

“पुणेकरांनो, खडकवासला धरणातील पाणी हे दूषित झालं आहे व त्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यावर होत असून आरोग्यावरही झालेला आहे. त्यामुळे धरणात सांडपाणी मिसळण्याचा प्रश्न केवळ धरण परिसरापुरता मर्यादित नसून, तो लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित आहे.

खडकवासला परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दूषित पाणी धरणाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

‘ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर व्हाईट ज्युनियर काळाच्या पडद्याआड; वयाच्या 34 व्या वर्षी निधन!

यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करणे काळाची गरज असून खडकवासला धरण परिसरात नियमित गस्त घालून सांडपाणी कुठून आणि कशा प्रकारे सोडले जाते, याची तपासणी करावी.

तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. नियमानुसार आवश्यक असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उभारणे बंधनकारक करावे. प्रक्रिया केलेले पाणीच निर्धारित निकषांनुसार सोडले जाईल, याची खात्री करावी.

 

विशेष म्हणजे याबाबतीत वरील गावांतील सर्वसामान्य ग्रामस्थांना दोष देणे योग्य नाही. गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासनाने संबंधित ग्रामपंचायतींना STP उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. कारण या परिसरातील जलस्रोतांचे संरक्षण म्हणजे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण आहे.

सुशिक्षित बेरोजगाराची धमाल गोष्ट उलगडणार! अंकुर वाढवेला लागली ‘कोलंबस”ची लॉटरी!

पुणेकर नियमित कर भरतात, तो स्वच्छ आणि सुरक्षित नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून; दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात यावे म्हणून नाही. त्याचबरोबर खडकवासला परिसरातील ग्रामस्थांनाही योग्य सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधा मिळणे आवश्यक आहे.

म्हणूनच पुणे महानगरपालिका प्रशासनाने या विषयाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता, सार्वजनिक आरोग्य आणि जलस्रोतांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहावे. खडकवासला धरणाचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस कृती करा. पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळालेच पाहिजे!”

दरम्यान, खडकवासला धरणातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत अमोल बालवडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सांडपाणी व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी महापालिका व संबंधित यंत्रणा कोणती ठोस पावले उचलतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

follow us