पराभवानंतरही आढळराव पाटलांनी दाखवली ताकद : विधानसभेपूर्वी CM शिंदेंकडून पुनर्वसन

पराभवानंतरही आढळराव पाटलांनी दाखवली ताकद : विधानसभेपूर्वी CM शिंदेंकडून पुनर्वसन

Shivajirao Adharao Patil President Pune MHADA : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली. (Shivajirao Adharao) लोकसभा निवडणुकिपूर्वी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्याने कुठेही कायदेशीर अडचण नको म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची आता पुन्हा निवड करण्यात आली आहे. (MHADA) ते शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार ते स्वीकारणार आहेत.

अडचणी वाढल्यामुळे पूजा खेडकर फरार?, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून हे गंभीर मुद्दे उपस्थित

२०२० पासून रिक्त 

गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याने आढळराव यांचा शिरूर हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य शासनाचे उपसचिव अजित कवडे यांनी काल याबाबतचे आदेश काढले. या पदाचा कार्यभार यापूर्वी कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आणि एकत्रित राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांभाळला आहे. हे पद २०२० पासून रिक्त होते.

 राज्यमंत्री पदाचा दर्जा नेपाळमध्ये सौर्या एअरलाईन्सच्या विमान कसं क्रॅश झालं; व्हिडिओ आला समोर

प्रादेशिक मंडळाचं कामकाजाबाबत धोरण आखणं, आढावा घेणं, नियंत्रण करणं, प्रादेशिक मंडळाच्या दोन प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणं, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामं म्हाडाच्या माध्यमातून त्यांना करता येणार आहेत. घाटगे यांनी हे पद एक ते दीड वर्ष सांभाळलं होतं. त्यांच्यापूर्वीही काही वर्षे हे पद रिक्त होते. पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी हे पद भूषविलं होतं. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आढळराव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube