जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या हिमायत बेगला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
Himayat Beg : देशभरात शांत शहर म्हणून पुणे शहराचा लौकिक पुसून टाकणाऱ्या जर्मन बेकरी स्फोट (German bakery Bombspot) प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेगला (Himayat Beg) आज जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) हिमायत बेगला हा जामीन मंजूर केला आहे. मात्र, नाशिकच्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नाशिकमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून हिमायत बेगवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल आहे. दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत असून बेग हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची भरती करत असल्याचा आरोप आहे.
रोहित पवारांवरील कारवाईला राजकारणाशी जोडू नका; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला
दरम्यान, 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 6.50 मिनीटांना कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 17 जण ठार तर 56 जण जखमी झाले होते. एटीएसने या गुन्ह्याचा तपास करून मिर्झा हिमायत इनायत बेग याला 7 सप्टेंबर 2010 रोजी अटक केली होती.. त्याच्यावर खटला चालवला गेला आणि पुणे सत्र न्यायालयाने त्याला 2013 ला फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानतंर उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. तसेच कट रचणं आणि बॉम्ब ठेवणं या आरोपातूनही त्याची मुक्तता करण्यात आली होती.
पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणाचा सूत्रधार हिमायत बेग याने नाशिकमध्ये दहशतवादी कृत्ये केली ाहे. अनेक देशविरोधी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. आतापर्यंतच्या तपासात तो ‘लष्कर-ए-तैयबा’चा सदस्य असल्याचे समोर आले आहे.