Chinchwad Bypoll : मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री घेतली जगताप कुटुंबियांची भेट; म्हणाले..

Chinchwad Bypoll : मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री घेतली जगताप कुटुंबियांची भेट; म्हणाले..

Chinchwad Bypoll : पिंपरी चिंचवड (Chinchwad Bypoll) विधानसभेतील भाजप आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री भेट घेत सांत्वन केले. आमदार जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी रात्री आ.जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील घरी जाऊन जगताप कुटुंबियांची भेट घेतली. घरातील सदस्यांची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की कार्यकर्ते थांबून राहिले होते. त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. येथील जागेवर अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या बहुमताने विजयी होतील. ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

वाचा : Pankaja Munde : पिंपरी-चिंचवडचा शास्तिकर लक्ष्मण जगतापांनी माफ केला

दरम्यान, पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला आहे.राजकीय पक्षाचे नेते उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरे करत आहेत. प्रचारसभा, मोटारसायकल रॅली, पदयात्रा, राजकीय चर्चा यांमुळे येथील वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचारासाठी चारच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचाराने वेग घेतला आहे.

Rohit Pawar : चिंचवड निवडणूक ही केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होणार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube