नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

पिंपरी : भारतात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. गेल्या दिवसांपासून दुचाकीने जगभ्रमंती करणारी रमाबाई ही चांगलीच चर्चेत आहे. महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज दिल्लीत भेट घेतली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane) यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, प्रवासात काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे या अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवडमधील २७ वर्षीची उच्चशिक्षित तरुणी रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढील वर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. या प्रवासादरम्यान, रमिला भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविणार आहे. रमिला ही आपल्या मतदारसंघातील असल्याने तिला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून पुढील प्रवास करण्याची विनंती तिने माझ्याकडे केली होती. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली. त्यांनीही तत्काळ वेळ दिली आणि आज रमिलाची पंतप्रधानासोबद भेट झाली.

Aditya Thackeray यांचे टेन्शन वाढले ? वरळीत काय होणार…?

संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, तुला संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना बारणे आणि रमाबाईने गुढी भेट दिली.

आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती देताना रमिला म्हणाल्या, सहा खंड, ४० देशामध्ये नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहे. भारत की बेटी म्हणून मी दुचाकीवरुन जगभ्रमंती करत आहे. लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे. भारताची संस्कृती प्रत्येक देशात पोहोचवण्यचा माझा मनोदय आहे. या प्रवासात संपूर्ण भारत माझ्यासोबत आहे असा विश्वास आहे. ८ मार्च २०२४ रोजी मी भारतात परत येणार आहे. मुंबईतील इंडिया गेट येथून ९ मार्चपासून प्रवासाला सुरुवात केली. तेथून १८०० किलोमीटरचे अंतर कापून आज दिल्लीत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. जगभ्रमंतीसाठी खासदार बारणे यांचे सहकार्य मिळत असल्याचं रमिला यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube