काँग्रस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण, हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांचा निर्णय

तुषार दामगुडे आणि साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचं प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडलं.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 02 25T215728.368

पुण्यातील स्वत:ला हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणाऱ्या तुषार दामुगडे आणि त्याच्या साथीदारांनी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार (Pawar) यांना स्वारगेट परिसरात मारहाण केली होती. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. या घटनेनंतर आता पुणे पोलिसांनी हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. एक गनमॅन पोलीस हनुमंत पवार यांच्यासोबत कायम असणार आहे.

पुणे पोलिसांकडून पवार यांना संरक्षण देण्यात आलं आहे. तुषार दामगुडे आणि साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचं प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हनुमंत पवार यांच्या सोबत आता गनमॅन पोलीस तैनात असेल. दरम्यान, काँग्रेसच्या विचारांचा पाईक असल्यानं प्रतिकार केला नाही. मी शेतीमधला माणूस आहे, हे मराठवाड्यातील लोकांना माहिती असेल. मी गाई-गुरे राखलेला माणूस आहे. आम्ही बैलाला कोपराने बुक्की देऊन खाली बसवायचो. मी दामगुडेला एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठू शकला नसता, असा पलटवार हनुमंत पवार यांनी केला आहे.

दामगुडे अन् हनुमंत पवार यांच्यातील वाद नेमका काय? हाणामारीमागे पडद्यावरची चर्चा; ठरली खरं कारण

या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शेअर करत कारवाईची मागणी केली होती. हनुमंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. तर, तुषार दामगुडे यांच्याकडील बंदूक जप्त करुन त्यांना सोडण्यात आलं होतं. दरम्यान, तुषार दामगुडे यांच्याकडून घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही खंत वाटत नसून जे केलं ते बरोबर केल्याचं सांगण्यात आलं आहे.

हनुमंत पवार यांना केलेल्या मारहाणीबाबत कोणताही पश्चाताप किंवा खंत वाटत नाही. मी जे केले ते योग्यच केले, असे मला वाटते. या प्रकारच्या लोकांना कधी कधी ठाम आणि स्पष्ट शब्दांतच उत्तर द्यावे लागते. त्या ठिकाणी जे काही घडले, त्याबद्दल मला कोणतीही खंत नाही. हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्या पार्श्वभूमीवर त्यांना ठोस प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं, असं तुषार दामगुडे म्हटला होता.

follow us