डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष MCA व MBA विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ’ सोहळा उत्साहात संपन्न

MCA व MBA विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 'दीक्षारंभ' सोहळा मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी शांताई सभागृहात यशस्वीरीत्या पार पडला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 23T212859.697

‘Diksharambh’ ceremony concludes with great enthusiasm : डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड मॅनेजमेंट (DYPIMCAM), आकुर्डी येथे शैक्षणिक वर्ष 2026-2027 मधील प्रथम वर्ष एम.सी.ए. (MCA) व एम.बी.ए. (MBA) विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ‘दीक्षारंभ’ (Induction Programme) सोहळा मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी शांताई सभागृहात यशस्वीरीत्या पार पडला. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून ‘डेक्सिट ग्लोबल’चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डॉ. अभय जेरे आणि सन्माननीय अतिथी म्हणून ‘टेक महिंद्रा’चे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे व्हॉईस प्रेसिडेंट व ग्लोबल हेड गोपाळ परास निस उपस्थित होते.

सकाळी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यानंतर दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. के. निर्मला यांनी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी तीन महत्त्वाचे स्तंभ मांडले: आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती (Lifelong Learning), वेगाने होणाऱ्या तांत्रिक बदलांशी जुळवून घेण्यासाठी निरंतर कौशल्य आत्मसात करणे (Skill Adoption), आणि व्यावसायिक जीवनात प्रभावी संवाद कौशल्याचे (Communication Skills) महत्त्व. त्यांच्या भाषणानंतर, संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

अंतर्गत आक्षेप, SIR आणि निर्णय प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, अंतिम निर्णय सर्वसंमतीने

या प्रसंगी उद्योग व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. अभय जेरे ‘डेक्सिट ग्लोबल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (तसेच केंद्र सरकारचे माजी मुख्य नवोपक्रम अधिकारी व AICTE चे माजी उपाध्यक्ष) यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठांतराच्या मानसिकतेतून बाहेर पडून सर्जनशील आणि समस्या निवारण (Problem-solving) वृत्ती स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘डिजाइन थिंकिंग’ (Design Thinking) पद्धती स्पष्ट करताना प्रत्यक्ष समस्या ओळखणे आणि त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यावर भर दिला. यासोबतच त्यांनी रुपयाचे मूल्य, आर्थिक नियोजन, आयुष्यभर शिकण्याची वृत्ती आणि आधुनिक बाजारातील बदलांशी जुळवून घेण्याची उदाहरणे स्पष्ट केली.

गोपाळ परास निस यांनी यशस्वी करिअरसाठी 3 महत्त्वाचे सकारात्मक दृष्टिकोन मांडले—सतत होणाऱ्या बदलांचा स्वीकार करणे, नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता ठेवणे आणि संघभावनेने समस्या सोडवणे. आर. ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त): कॅम्पस डायरेक्टर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वैयक्तिक जबाबदारी आणि शैक्षणिक कठोर परिश्रम आत्मसात करण्याचे आवाहन केले. जस्मिता कौर डीन कॅम्पस प्लेसमेंट (DDYPEC, आकुर्डी) यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आणि कॉर्पोरेट जगतातील प्लेसमेंटच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचा समारोप MCA विभागाच्या प्रमुख व उपप्राचार्य डॉ. कविता सूर्यवंशी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला, ज्यानंतर राष्ट्रगीत आणि समूह छायाचित्राने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्याचे आयोजन प्रा. राहुल चौधरी व प्रा. गिरिजा परांजपे यांनी केले.

follow us