तुमच्या काकाने ऊसाला पाच हजारांचा दर ठेवलाय का ? ऊसदरावरून वळसे पाटलांनी सुनावले !

Dilip Walse: साखर कारखानदारी अडचणीत असताना काही लोक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Dilip Walse

Dilip Walse On Raju Shetti : दुष्काळामुळे राज्यातील साखर कारखानदारीसमोर ऊसटंचाईचे संकट उभे राहिले आहेत. त्यामुळे ऊसदरावरून राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यंदा उसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर देण्याची मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्याला माजी सहकारमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सुनावले आहे.

स्वप्न आणि सत्याच्या सीमारेषेवर उलगडणार नात्यांचा भावस्पर्शी प्रवास; ‘इरावती’ 12 फेब्रुवारीला चित्रपटगृहांत

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी दिलीप वळसे पाटील यांनी ऊस दराबाबत विधान केले आहे. त्यांनी राजू शेट्टींचे नाव न घेतला शेतकरी संघटनांना सुनावे. ते म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत असताना काही लोक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी संघटना उसाला पहिली उचल पाच हजार रुपये देण्याची मागणी करत आहे. एखादा कारखाना चालवायला घ्यावा आणि मग उसाला पहिली उचल पाच हजार रुपये मागावी. कुठून देणार उचल? कर्ज काढून द्यायची का? कारखाना बंद पाडायचा आहे का? अशा शब्दांत वळसे पाटील यांनी या मागणीवर नाराजी व्यक्त केली.

पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महाग; इंधनाचे दर शंभरीपार, कच्चं तेलही 100 डॉलरच्या पुढे

यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याला उद्देशून, “तुमच्या काकाने उसाला पाच हजारांचा दर ठेवलाय का?” असा सवालही केला. साखर कारखान्यांचे आर्थिक गणित आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ऊसदराच्या मागण्या केल्या पाहिजेत, असा त्यांचा सूर होता.


यंदा उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी नाही?

यंदाच्या गळीत हंगामाबाबत बोलताना वळसे पाटील यांनी इथेनॉल निर्मितीच्या धोरणाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील साखरेची गरज आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदा उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळणार नाही. त्यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी मळीवर अवलंबून राहावे लागू शकते. या निर्णयाचा साखर कारखान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इथेनॉल निर्मिती हा कारखान्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असल्याने त्यासंबंधीच्या धोरणाकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.


पुढील वर्षी साखर कारखाने सुरू होतील का? वळसे पाटलांची चिंता

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा साखर कारखान्यांना ऊसटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यातच आगामी हंगामासाठी ऊसलागवड अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याबाबतही वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त केली.


राजू शेट्टींचा 5,500 रुपयांच्या दरासाठी एल्गार

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 25 वी ऊस परिषद पार पडली. या परिषदेत राजू शेट्टी यांनी यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर देण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

follow us